रायसोनीच्या विद्यार्थ्याचा औद्योगीक दौरा

0
49

साईमत जळगाव प्रतिनिधी

 

येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविध्यालयातील विद्यार्थ्यांचा शहरालगत असलेल्या कोगटा इंडस्ट्रीज येथे अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयातील प्रथम वर्ष एमबीए शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाने या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. या क्षेत्रभेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच औद्योगिक कार्यप्रणाली कशी चालते. कच्चा मालावर प्रक्रिया करून पक्का माल कशा पद्धतीने तयार केला जातो. त्याची साठवणूक, हिशोब पद्धती, वितरण पद्धती, अत्याधुनिक उत्पादन प्रक्रिया, ऑटोमेशन, निर्यात, वित्त आणि एचआर या सर्व बाबींची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात नेऊन समजावी व त्याचा उपयोग भावी काळात व्हावा यासाठी या अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते असे संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी या दौऱ्याची पार्श्वभूमी सांगताना नमूद केल.

महाराष्ट्रातील किंबहुना देशातील डाळ उद्योग क्षेत्रातील बळकटीकरणासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या कोगटा इंडस्ट्रीजला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची कार्यपद्धती आणि कामकाज जाणून घेण्याची संधी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मिळाली. या अभ्यासदौऱ्यात कोगटा इंडस्ट्रीजमधील प्रोडक्शन अॅड मार्केटिंग हेड करण कोठारी यांनी इंडस्ट्रीजमधील विविध बारकावे सांगत मार्गदर्शन केले. सरतेशेवटी चर्चासत्रांची सांगता प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाने झाली. रायसोनी महाविद्यालयाच्यावतीने प्रा. तन्मय भाले व प्रा. जितेंद्रसिंग जमादार यांनी या अभ्यास दौऱ्याचे समन्वय साधले तर कोगटा इंडस्ट्रीजचे विद्यार्थ्यांच्या वतीने उपस्थित प्राध्यापकांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here