साईमत, जामनेर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा पोदार जीनियस स्कूलच्या मैदानावर नुकत्याच झाल्या. त्यात इंदिराबाई ललवाणी शाळेच्या मुले, मुली १४, १७ व १९ सर्व वयोगटात मुला-मुलींनी यश संपादन करून आपले वर्चस्व राखले. स्पर्धेचे उद्घाटन जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोदार जीनियस स्कूलचे संस्थाध्यक्ष प्रकाश पाटील, नगर परिषद संगणक संचालक सूरज पाटील, राष्ट्रीय शुटींगबॉल खेळाडू हितेश पाटील, तालुका क्रीडा संयोजक डॉ.आसिफ खान, स्पर्धा समिती प्रमुख जी.सी.पाटील, उपमुख्याध्यापक शेख जलाल, इंदिराबाई ललवाणी विद्या. क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार, बोहरा स्कूल शेख शाहिद, वसीम अहमद, गणेश कोळी, विशाल इंगळे, शीतल बोदडे आदी क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
स्पर्धेत तालुक्यातून १६ संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेत प्रमुख पंच जी.सी.पाटील, शेख जलाल, प्रवीण तायडे, प्रणव अंभोरे, करण जाधव, शेख शाहिद, गजानन कचरे यांनी काम पाहिले. स्पर्धेचा निरोप समारंभप्रसंगी पोदार जीनियस स्कूलचे संचालक डॉ.नंदलाल पाटील विजयी झालेल्या संघाला पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सूत्रसंचालन मनीषा चौधरी यांनी केले. स्पर्धेचा निकाल प्रा.समीर घोडेस्वार यांनी जाहीर केला. यशस्वीतेसाठी पोदार जिनियस स्कूलचे संदीप तायडे, दीपाली पाटील, मनोज पाटील, संजय पाटील, नंदू पाटील, राहुल भारंबे, संदीप तायडे, क्रीडा शिक्षक झहीर खान यांनी परिश्रम घेतले.
व्हॉलीबॉल संघाचा निकाल असा-
१४ वर्ष मुले – विजयी- इंदिराबाई ललवाणी विद्यालय, उपविजयी – अंजुमन हायस्कूल, १४ वर्ष मुली – विजयी- इंदिराबाई ललवाणी विद्यालय, उपविजयी – जिल्हा परिषद शाळा, एकुलती, १७ वर्ष मुले- विजयी – इंदिराबाई ललवाणी विद्यालय, उपविजयी- अंजुमन हायस्कूल, १७ वर्ष मुली – विजयी – इंदिराबाई ललवाणी विद्यालय, उपविजयी – बोहरा सेंट्रल स्कूल, १९ वर्ष मुले – विजयी – इंदिराबाई ललवाणी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, १९ वर्ष मुली- विजयी – इंदिराबाई ललवाणी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय.