साईमत, जामनेर : प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय व जळगाव जिल्हा ॲम्युचर डॉजबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय डॉजबॉल स्पर्धा जामनेर गुरुवारी, १९ ऑक्टोबर रोजी घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांनी मुख्य क्रीडाज्योत प्रज्ज्वलित करून केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वरणगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा.आशिषकुमार चौधरी, इंदिराबाई ललवाणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, सचिव किशोर महाजन, संचालक फकीरा धनगर, संजय महाजन, मुख्याध्यापक एस.आर.चव्हाण, नाशिक जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव मुकुंद झनकर, धुळे जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव तथा महाराष्ट क्रीडाशिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष डॉ.आनंद पवार, जळगाव जिल्हा युवा क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ.रणजित पाटील, जामनेर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष मुख्याध्यापक आर.एस.चौधरी यांची उपस्थिती होती. प्रारंभी राष्ट्रीय खेळाडू सुष्मीत पाटील व मयूर चांडे यांनी क्रीडाज्योत मैदानात आणली. त्यावरून मुख्य क्रीडाज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे, संस्थेचे सचिव किशोर महाजन, प्रा.आशिष चौधरी यांच्या हस्ते पार पडला. स्पर्धेचा निकाल असा १७ वर्षातील वयोगटात मुलींमध्ये इंदिराबाई ललवाणी विद्यालय,जामनेर, बी.यु.एन.रायसोनी विद्यालय, दे.ना.पाटील विद्यालय, नाशिक, १७ वर्षातील वयोगटात मुलांमध्ये इंदिराबाई ललवाणी विद्यालय, जामनेर, मुक्तांगण इंग्लिश स्कुल, बोरकुंड, धुळे, पिंपळादेवी माध्यमिक विद्यालय, मोहाडी, धुळे, १९ वर्षातील वयोगटात मुलींमध्ये स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव, डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल, नंदुरबार, दे.ना.पाटील ज्युनियर कॉलेज, नाशिक, १९ वर्षातील वयोगटात मुलांमध्ये डी.आर.ज्युनियर कॉलेज, नंदुरबार, जी.एम.डी.कॉलेज सिन्नर, नाशिक, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव.
स्पर्धेचे तांत्रिक प्रमुख म्हणून प्रा.आशिषकुमार चौधरी, स्पर्धा आयोजक गिरीश पाटील, स्पर्धा समनवयक म्हणून डॉ.रणजित पाटील, डॉ.कांचन विसपुते तर पंच म्हणून विजय रोकडे, नितीन पाटील, सुष्मीत पाटील, प्रकाश सपकाळे, विलास निंबा पाटील, हरिभाऊ राऊत, नरेंद्र पाटील, धीरज जावळे, सचिन सूर्यवंशी, सचिन महाजन, आंतरराष्ट्रीय खेळाडू उमाकांत जाधव, चेतन जोशी, प्रसन्न जाधव, भगवान बेनाडे, गजानन कचरे, प्रा.समीर घोडेस्वार यांनी काम पाहिले. प्रास्ताविक जळगाव जिल्हा ॲम्युचर डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, सूत्रसंचालन प्रा.समीर घोडेस्वार तर आभार बी.पी.बेनाडे यांनी मानले.