साईमत जळगाव प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या साठ वर्षांत भारताने विज्ञान-तंत्रज्ञान आणि अवकाश क्षेत्रात प्रगतीची मोठी झेप घेतली आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रात तर भारताचा दबदबा आहे. आपण आपली अस्मिता जपली पाहिजे म्हणजेच ‘भारतीय’ ही ओळख आपली ‘प्रथम ओळख’ असल्याचे प्रतिपादन मुंबईतील व्ही.जे.टी.आय. महाविद्यालयातील माजी सहयोगी अधिष्ठाता आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी केले. येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात ता. १२ रोजी “इनोव्हेशन टेक्नोलॉजी अॅन्ड इंटर्नप्रणरशिप” या विषयावर राष्ट्रीय परिषदेच्या आयोजन प्रसंगी ते बोलत होते.
या परिषदेत मुंबईतील व्ही.जे.टी.आय. महाविद्यालयातील माजी सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. संजय मंगला गोपाळ, कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आयआयसीचे संचालक डॉ. राजेश जावळेकर, स्टार्टअप इंडिया व नवउद्योजकांचे मेंटोर निखिल कुलकर्णी, विनले पॉलीमरचे संचालक प्रमोद संचेती उपस्थित होते. यावेळी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रा. डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी आपले अनुभव कथन करतांना सांगितले कि, स्वातंत्र्याच्या साठ वर्षांत भारताने विज्ञान-तंत्रज्ञान आणि अवकाश क्षेत्रात प्रगतीची मोठी झेप घेतली आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रात तर भारताचा दबदबा आहे. शिवाय स्वतंत्र उपग्रह तयार करून ते सोडण्यापर्यंतचे तंत्रज्ञान देशाने विकसित केले आहे. तसेच आपल्याकडे वर्षभर भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध आहे. आपल्या आर्थिक उन्नतीसाठी या ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे असे सांगत त्यानी आपण आपली अस्मिता जपली पाहिजे म्हणजेच ‘भारतीय’ ही ओळख आपली ‘प्रथम ओळख’ असल्याचे सांगत त्यांनी विविध उदाहरणाद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
परिषदेचे प्रास्ताविक जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी केले. जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या सेमिनार हॉलमध्ये परिषदेतील उपस्थित वक्त्यांनी आपल्या अतिशय उत्साहवर्धक मार्गदर्शनातून उपस्थितांना खिळवून ठेवले. जळगाव व परिसरातील उद्योजक, व्यावसायिक, प्राध्यापक ते महाविद्यालयीन विद्यार्थी आदिंची मोठयासंख्येने उपस्थिती होती.
या राष्ट्रीय परिषदेचे सूत्रसंचालन प्रा. अंजली बियाणी यांनी केले तर आभार प्रा. जितेंद्र जमादार यांनी मानले तसेच या परिषेदेचे समन्वय प्रा. डॉ. योगिता पाटील, प्रा. डॉ. ज्योती जाखेटे, प्रा. सरोज पाटील, प्रा. विशाल राणा, प्रा. मुकेश अहिरराव, प्रा. तन्मय भाले, प्रा. रोहित साळुंखे, प्रा. कविता पाटील, प्रा. प्रतीक्षा जैन, प्रा. प्राची जगवाणी, प्रा. श्रेया कोगटा, प्रा. डॉली मंधान यांनी संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांच्या मार्गदर्शनाखाली साधले तर सदर परिषदेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष सुनील रायसोनी यांनी कौतुक केले. प्रदर्शन पाहण्यास जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील विध्यार्थी, प्राध्यापक व शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती. ग्रंथपाल शीतल पाटील यांनी आभार मानले.