हांगझोऊ : वृत्तसंस्था
चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाने अंतिम सामन्यात जपानचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. फायनल मॅचमध्ये भारताकडून मनप्रीत सिंग, हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास यांनी गोल केले. फायनलमध्ये भारताने जपानवर ५-१ असा विजय मिळवत देशाला सुवर्णपदक जिंकून दिले. या विजयासह हॉकी संघाने २०२४ साली होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिकसाठी प्रवेश मिळवला आहे तर भारताच्या पदकांची संख्या ९५वर पोहोचली आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हॉकीमधील हे चौथे सुवर्णपदक आहे.याआधी भारताने १९६६, १९९८, २०१४ साली सुवर्ण जिंकले होते.



