नवी दिल्ली : वृत्तसंस्था
यावर्षी एकदिवसीय विश्वचषकाचे सामने भारतात भरवले जाणार आहेत.विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यात कुणाचं पारडं जड राहणार? याबाबत क्रिकेटतज्ज्ञांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतच आहेत पण धार्मिक गुरू बागेश्वर बाबा यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीने अलीकडेच बागेश्वर बाबांची मुलाखत घेतली.या मुलाखतीत त्यांना क्रिकेट पाहता का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बागेश्वर बाबांनी होकारार्थी उत्तर दिले.त्यानंतर हा सामना कोण जिंकणार? असे विचारल्यानंतर बागेश्वर बाबा म्हणाले, “बाप बाप होता है”. 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यात भारतीय संघच जिंकेल, असे संकेत बागेश्वर बाबांनी दिले आहेत.