बोदवड न्यायालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

0
25

साईमत बोदवड प्रतिनिधी

शहीदांचे स्मरण करण्यासाठीच स्वातंत्र दिन असे भावनिक उद् गार ॲड. अर्जुन टी. पाटील यांनी काढले. ते येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात स्वातंत्र दिनानिमित्त आयोजित स्वातंत्र्यासाठी शहीदांचे स्मरण या विषयावर आपले विचार मांडतांना बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यामुळेच देशामध्ये न्यायाचे, व समतेचे राज्य आले त्यामुळेच घटनेची निर्मिती करण्यात आली.स्वातंत्र मिळाले म्हणुनच देश प्रजासत्ताक झाला. घटनेच्या सरनामा हा घटनेचा आत्मा आहे. सरनाम्यातील सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्षक, प्रजासत्ताक, गणराज्य या शब्दावरून असे दिसुन येते की, देशाची जनता ही सविधानाने दिलेल्या अधिकारानुसार सार्वभौम झालेली आहे. देशातील कोणत्याही नागरीकाचे जिवीत, वैयक्तीक, आर्थिक स्वातंत्र कोणीही हिरावुन घेवु शकत नाही. हे सर्व देश स्वातंत्र्य झाल्यामुळेच शक्य झाले आहे. यावेळी ॲड. धनराज सी. प्रजापती यांनीही आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष न्या.क्यु.ए.एन. सरवरी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन टी. पाटील होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन ॲड. के.एस.इंगळे यांनी केले. कार्यक्रमास ॲड.मिनल अग्रवाल, जोशी मॅडम, गजानन बळीराम चौधरी ,ॲड.विजय मंगळकर, ॲड.मुकेश पाटील, ॲड.मोहीत अग्रवाल,.ॲड.अमोल पाटील , ॲड.तेजस्विनी काटकर,ॲड.आय.डी.पाटील, न्यायालयीन कर्मचारी प्रशांतकुमार बेदरकर,जाधव भाऊसाहेब, गरड भाऊसाहेब, सोनु थोरात, न्यायालयीन कर्मचारी वर्ग, बिलिफ वर्ग, पक्षकार वर्ग, पो.कॉ. आयुब गंभीर तडवी , भुषण उत्तम सोनवणे, राजेश झा.महाजन, प्रदिपकुमार चंद्रसिंग चव्हाण आदी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास रूपेश माळी , शुभम इंगळे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here