सरकार फोडाफोडीत व्यस्त असल्यानेच इर्शाळवाडीसारख्या घटनांकडे दुर्लक्ष : अमित ठाकरे

0
21
सरकार फोडाफोडीत व्यस्त असल्यानेच इर्शाळवाडीसारख्या घटनांकडे दुर्लक्ष अमित ठाकरे

साईमत जळगाव प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत आज दरळ कोसळून त्यात 200 ते 250 लोक दाबले गेले. त्यात 17 ते 18 लोकांचा मृत्यू झाला. सरकारने यापूर्वीच या लोकांचे पुनर्वसन करणे गरजेचे होते. यापूर्वी घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होते. याचा अर्थ सरकांर फोडाफोडीत व्यस्त होते. अन्यथा अशा घटना टाळता आली असती, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे गुरुवारी शहरात विद्यार्थी सेनेच्या बैठकीसाठी आले होते.यावेळी हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये पत्रकारांनी त्यांना रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत घडलेल्या दुर्घटनेबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी हे सरकारचे अपयश असल्याचे सांगितले. पावसाळ्यापूर्वी त्यांना इतरत्र हलवता आले असते. किंवा डोफ्लगराखाली असलेल्या घरांचे सरकारने यापूर्वीच पुनर्वसन करणे गरजेचे होते. कारण यापूर्वी ही अशा घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. परंतु सरकार फोडाफोडीत व्यस्त असल्यानेच त्यांना या गोष्टींकडे बघायला वेळच मिळाला नाही. त्यामुळे नाहक 17 ते 18 लोकांचा बळी गेला. हे सरकारचे अपयश असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

राज साहेबांनी यापूर्वीच सरकारला डोफ्लगराखाली घरे असलेल्या ठिकाणी अशा दुर्घटना घडू शकता,असा इशारा दिला होता. तरीही सरकारने दुर्लक्ष केल्याचेही अमित ठाकरे यांनी सांगितले.

महिनाभरात विद्यार्थी सेनेची नवीन कार्यकारिणी
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकारिणीची बैठक घेऊन त्यातून सक्रिय व ज्याना यात अधिक रस आहे, अशा विद्यार्थ्यांची निवड कार्यकारिणीत करणार आहे. यासाठी महिनाभराचा कालावधी लागेल. त्यानंतर नवीन विद्यार्थी सेनेची कार्यकारिणी जाहीर करेल, असेही अमित ठाकरे यांनी सांगितले.

शहरात भव्य स्वागत

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचे शहरात प्रथमच आगमन झाल्यावर येथील मनसेतर्फे त्यांचे भव्य पुष्पहार अर्पण करून आकाशवाणी चौकात स्वागत करण्यात आले. यावेळी अमित ठाकर यांना बघण्यासाठी तरूणाईने मोठी गर्दी केली होती. बरेच कार्यकर्ते आपल्या मोबाईलमध्ये त्यांची छबी टिपण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले. त्यांच्या स्वागताला मनसेचे जिल्हाध्यक्ष जमिल देशपांडे, आशिष सपकाळे, विनोद शिंदे यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here