Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Incident In Khedi Hudko Area : खेडी हुडको परिसरातील घटना : अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन
    जळगाव

    Incident In Khedi Hudko Area : खेडी हुडको परिसरातील घटना : अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 19, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    परिवाराच्या आक्रोशाने परिसर हेलावला

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी:

    घरी उशिरा आल्याच्या कारणावरून वडिलांनी रागावल्याने आणि किरकोळ मारहाण केल्याने एका अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करुन जीवन संपविल्याची घटना गुरुवारी, १९ जून रोजी दुपारी १२ वाजता उघडकीस आली. प्रज्ञा रवींद्र शिंदे (वय १६, रा. खेडी हुडको परिसर, जळगाव) असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

    प्रज्ञाचे वडील रवींद्र शिंदे हे सेंटिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना पत्नी, तीन मुली आणि दोन मुले असा परिवार आहे. १८ जून रोजी सकाळी प्रज्ञा घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेली होती. ती रात्री ८ वाजता घरी परतल्यानंतर वडिलांनी तिला उशिरा येण्याबद्दल विचारले आणि किरकोळ मारहाण करत रागावले. त्याचा राग आल्याने प्रज्ञा पुन्हा घरातून कुणालाही काही न सांगता निघून गेली. त्यानंतर तिने राहत असलेल्या घरापासून ५०० मीटर अंतरावरील बैठक हॉल जवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. १९ जून रोजी दुपारी १२ वाजता हा प्रकार समोर आला.

    नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून काढला बाहेर

    घटनास्थळी प्रज्ञाच्या नातेवाईकांसह शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कविता कमलाकर यांच्यासह कर्मचारी दाखल झाले. काही नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. मुलीचा मृतदेह पाहताच तिच्या आई-वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. मयत प्रज्ञाच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Dhanora, Chopda Taluka:वाचन हे स्पर्धा परीक्षेचे आधार कार्ड” – खुशबू महाजन यांचा संदेश

    January 1, 2026

    Jalgaon:विद्यापीठातील दोन अधिकारी सेवेतून निवृत्त

    January 1, 2026

    Jalgaon:१५ जानेवारी जळगाव निवडणूक: मतदान हक्कासाठी भरपगारी सुट्टी बंधनकारक

    January 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.