
स्पर्धेत २१ जिल्ह्यातील ३४३ खेळाडूंचा समावेश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
३५ वी ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ जिल्हा क्रीडा संकुलात होत आहे. यासाठी राज्यातून मुलींच्या सब ज्युनिअर, ज्युनिअर व सिनियर गटाच्या २१ जिल्ह्यातील ३४३ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. जळगावात ही स्पर्धा तीन दिवस चालणार असून २९ नोव्हेंबरला स्पर्धेचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या मान्यतेने जळगाव हौशी जिम्नॅस्टिक्स असोसिएशनतर्फे स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मुंबई शहर मुंबई उपनगर व ठाण्याच्या खेळाडूंनी वरिष्ठ व कनिष्ठ गटातून वर्चस्व राखले. ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धेत रोप, सुप, बाॅल, क्लब, रिबन या प्रकारात मुंबई शहर, ठाणे व पुण्याच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आपापल्या गटात विजय मिळवला. स्पर्धेतील विजेत्यांमध्ये वरिष्ठ गट आॅल राऊंडमध्ये प्रथम किमया कारले ठाणे, द्वितीय शुभश्री मोरे मुंबई शहर, तृतीय परीना मदनपोत्रा मुंबई शहर, कनिष्ठ गट ऑल राऊंडमध्ये प्रथम व्रिती शहा पुणे, द्वितीय शमिका जोशी पुणे, तृतीय अरुंधती कुलकर्णी पुणे यांचा समावेश आहे. स्पर्धा तांत्रिक समिती प्रमुख म्हणून मानसी सुर्वे, अक्षता शेटे, वर्षा उपाध्ये काम पाहत आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक धर्मेंद्रकुमार सिंह, मुख्य व्यवस्थापक सागर खेडेकर, प्राचार्य डॉ. एल.पी.देशमुख, सुभेदार मेजर सुरेश कुमार, सतीश देशमुख, एमएसआरएलएमचे जिल्हा व्यवस्थापक चंद्रकांत सोनवणे, प्रा. वासुदेव पाटील, स्वामी समर्थ शैक्षणिक मंडळाच्या संचालिका ज्योती पाटील, रामराजे पाटील, सुभाष सांगोरे, विकास वाघ, विराज कावडीया आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी जिल्हा संघटनेचे खजिनदार अक्षय सोनवणे, महेंद्र साळुंखे, प्रा. शिवराज पाटील, शिवम पाटील सहकार्य करीत आहेत.
स्पर्धेचा रविवारी समारोप
३५ व्या ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धेचा रविवारी, ३० रोजी होणार आहे . स्पर्धेनंतर दुपारी बक्षीस वितरणाने समारोप होईल, असे जिल्हा संघटनेचे सचिव प्रवीण पाटील यांनी सांगितले.


