गोदावरी अभियांत्रिकीत प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी प्रवर्तन इंडक्शन प्रोग्रामचे  उद्घाटन

0
14

गोदावरी अभियांत्रिकीत प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी प्रवर्तन इंडक्शन प्रोग्रामचे  उद्घाटन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा संस्थेतील प्राध्यापकांशी सुसंवाद निर्माण व्हावा व त्यांना शैक्षणिक वातावरणाशी जुळवून घेता यावे या उदात्त हेतूने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसीय इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील,  डॉ.नितीन भोळे (विभाग प्रमुख, बेसिक सायन्स अँड ह्यूम्यानिटीज), डॉ. ईश्वर जाधव (रजिस्ट्रार),  डॉ.विजयकुमार वानखेडे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर)तसेच सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग व प्रथम वर्षाचे सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रवर्तन इंडक्शन प्रोग्राम बद्दल प्रवर्तन म्हणजे नवीन सुरुवात, आरंभ किंवा कोणत्याही कामासाठी प्रवृत्त करणे असा होय. करिअरच्या सुवर्णसंधी या महत्त्वाच्या विषयावर त्यांनी प्रकाश टाकताना, नवनवीन क्षेत्रांमध्ये तुम्ही कसे करिअर करू शकतात व त्यासाठी महाविद्यालयात राबविण्यात येणारे विविध उपक्रम याबद्दल सांगितले.

यावेळी डॉ. उल्हास पाटील यांनी समर्पक शब्दात विद्यार्थ्यांशी चर्चा करून मार्गदर्शन करतांना काही प्रश्न विचारले व महाविद्यालयाबाबत असलेला दृष्टिकोन विचारला. जीवनात यशस्वी होण्यासाठी बर्निंग डिजायर (तीव्र इच्छाशक्ती) जोपासणे गरजेचे आहे.स्वतःमध्ये अमुलाग्र बदल घडवायचे असतील, तर तुमची अभियांत्रिकीची चार वर्षे या महाविद्यालयाला समर्पित करा. त्याच बरोबर शिस्त, व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य यावर आपले प्रभुत्व महाविद्यालयीन कालावधीतच विकसित करा.नामांकित कंपन्यांमध्ये निवड होण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, देश व विदेश या ठिकाणी आपल्या महाविद्यालयाचे ४००० च्या वर माजी विद्यार्थी कार्यरत आहेत. त्याच पद्धतीने तुमचीही नामांकित कंपन्यांचे मध्ये निवड होऊ शकते, फक्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी तयार केलेल्या रोड मॅप वर चालायचे आहे असे सांगितले.

कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून प्रा.तृषाली शिंपी यांनी काम पाहिले. प्रथम वर्ष विभागाचे  डॉ. सरोज भोळे, डॉ.ललिता पाटील, प्रा. संजय चौधरी, प्रा. श्रद्धा वारके तसेच महाविद्यालयातील प्रथम वर्षाचे सर्व प्राध्यापक वर्ग यांची मदत झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. खुशाली बेलदार यांनी केले.कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख डॉ. नितीन भोळे व प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here