साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आणि चाळीसगाव राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात स्वा.सै. कर्मवीर शिक्षण महर्षी नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण यांच्या शतकोत्तर जयंती महोत्सव वर्षानिमित्त राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन माजी कामगार राज्यमंत्री डॉ.हेमंत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी चाळीसगाव राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेडचे चेअरमन डॉ.विनायक चव्हाण होते.
यावेळी माजी मंत्री एम.के. पाटील, खा.उन्मेष पाटील, माजी आ.राजीव देशमुख, संस्थेचे सचिव, प्राचार्य बाळासाहेब विश्वासराव चव्हाण, संस्थेच्या व्हा. चेअरमन श्रीमती पुष्पा भोसले, सहसचिव रावसाहेब साळुंखे, भैय्यासाहेब पाटील, प्रमोद पाटील, आर्कि. धनंजय चव्हाण, ॲड.साहेबराव पाटील, सुनील देशमुख, बारीकराव वाघ, अलका बोरसे, भाऊसाहेब पाटील, महेश चव्हाण, सोनूसिंग राजपूत, तात्यासाहेब निकम, भूषण भोसले, हरीश महाले, शरद मोराणकर, उज्ज्वला पाटील, अनिल कोतकर, योगेश पाटील, कर्तारसिंग परदेशी, अशोक खलाणे, बाबासाहेब वसंत चंद्रात्रे, राजेंद्र चौधरी, डॉ. दिलीप देशमुख, डॉ. सुभाष निकुंभ, रामचंद्र जाधव, प्राचार्य डॉ.एस.आर. जाधव, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा.सी.बी.पवार, उपप्राचार्या डॉ.उज्ज्वल मगर, उपप्राचार्य डॉ.जी.डी. देशमुख, उपप्राचार्य के.बी.पाटील, मुकेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करुन स्व.नानासाहेब चव्हाण यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उद्घाटन केले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे प्राचार्य डॉ.एस. आर.जाधव, राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा. सी.बी.पवार यांनी स्वागत केले. सुरुवातीला ईशस्तवन, स्वागत गीत कांचन सोनार, नंदिनी यादव, पूनम सोनार, योगिता पाटील, नूतन पाटील यांनी सादर केले.
मान्यवरांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन
याप्रसंगी माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख, माजी मंत्री एम.के.पाटील, संस्थेचे सचिव बाळासाहेब विश्वासराव चव्हाण, खा. उन्मेश पाटील, माजी आ.राजीव देशमुख, चेअरमन डॉ.विनायक चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करुन शिक्षणमहर्षी नानासाहेब यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नानासाहेबांचे विचार, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्य, सेवा, त्याग आणि चारित्र्य आदींची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, म्हणून महाविद्यालयाच्यावतीने विशेषांकाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यांनी घेतले परिश्रम
स्पर्धेसाठी प्राचार्य डॉ.एस.आर. जाधव, राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा.सी.बी.पवार यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी उपप्राचार्या डॉ.उज्ज्वल मगर, उपप्राचार्य डॉ.जी.डी.देशमुख, उपप्राचार्य के.बी.पाटील, संयोजन समिती प्रमुख मुकेश पवार, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत. प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य डॉ.जी.डी. देशमुख यांनी करुन दिला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.एस. आर.जाधव, सूत्रसंचालन मुकेश पवार तर आभार डॉ.मनोज शितोळे यांनी मानले.