साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगाव खुर्द येथे नवीन स्वच्छतागृह उभारण्यात आले. ओरिएंट सिमेंट लिमिटेडमधील प्रमुख मान्यवर व गावातील ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत या स्वच्छतागृहाचे लोकार्पण करण्यात आले.
मागील काही वर्षांपासून ओरिएंट लिमिटेड नशिराबाद कंपनीजवळ असलेले जळगाव खुर्द येथे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून गावातल्या सर्व आबाल वृद्धांच्या आरोग्याचा सर्वांगीण विचार करून गावात नवीन स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली.
यापारसंगी मनोगत व्यक्त करताना रोहित जोशी यांनी सांगितले कि, गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आमचे नैतिक कर्तव्य असून भविष्यात हि असेच समाजहिताचे उपक्रम राबविले जातील.
या स्वच्छतागृहाचे लोकार्पण प्रसंगी ओरीएंट सिमेंट कंपनीचे एच.आर. विभाग प्रमुख रोहित जोशी, एच.आर. विभागाचे सुदर्शन मोरे, सुरक्षा विभागाचे प्रमुख प्रदीप पानसे, तांत्रिक विभागाचे प्रमुख समित भोभाटे, विजय वाणी, ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय पाटील, मोहन जाधव, प्रवीण सपकाळे, पंढरी सपकाळे, सुरेश कोळी, तिरुपती कारापुरी, ग्रामपंचायत सदस्य कुंदन पाटील, गोकुळ सपकाळे, लखन सुरवाडे आदी उपस्थित होते. ओरीएंट सिमेंट कंपनीच्या या सामाजिक उपक्रमामुळे सर्व गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करत कंपनीचे आभार व्यक्त केले.