साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील तीन ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा फलकाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. त्यात करगाव तांडा ४.क्र, चिंचगव्हाण तांडा, विसापूर तांडा हातगाव या शाखांचा समावेश आहे. यावेळी मोठ्या संख्येने अनेकांनी पक्षात प्रवेश केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांच्या हस्ते पक्षात प्रवेश करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रजल चव्हाण, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, तालुका संघटक श्याम पाटील, तालुका उपाध्यक्ष राज राठोड, गणेश चव्हाण, सचिन पाटील, तालुका सरचिटणीस ईश्वर राठोड, म.न.वि.से.चे कल्पेश सुतार, शाखाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह नागरिक उपस्थित होते.