गुढेला भाजीपाला, फळे उत्पादक खरेदी विक्री संस्थेचे उद्घाटन

0
12

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

तालुक्यातील गुढे येथे श्री गोपेश्वर महादेव सहकारी भाजीपाला व फळे उत्पादक खरेदी विक्री संस्था मर्यादितचा उद्घाटन सोहळा एम. के. पाटील आणि शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या हस्ते नुकताच झाला. याप्रसंगी डॉ. उत्तमराव महाजन, उद्धवराव महाजन, विकासोचे चेअरमन भाऊराव माळी, दिलीप पाटील, रघुनाथ माळी, संजय पाटील, श्याम सर तसेच कोळगावसह समस्त ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

संस्थेच्या मालकीच्या जमिनीवर भाजीपाला आणि फळझाडे यांची लागवड करणे व उत्पादन कार्यक्रम अंमलात आणणे, आपल्या संस्थेच्या अंतर्गत भाजीपाला व फळझाडे लागवडीकरीता यंत्रणा व साधन सामग्री उभी करणे, भाजीपाला व फळांची चांगल्या प्रकारे साठवणूक करणे, त्यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करणे, शीतकरणयुक्त गोदाम उभारणे तसेच यावर प्रतिबंधक औषधे, पावडर वगैरे फवारणे असा संस्थेचा उद्देश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here