साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
नगरपरिषदेच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत स्वच्छ भारत अभियान कक्ष, आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष व तक्रार निवारण केंद्राचे शुक्रवारी, १५ सप्टेंबर रोजी चाळीसगाव नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी श्वरीमती मोना कुंदन पवार, मुकादम राजेश चंदेले, सफाई मित्र शैलेद्र खैरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, सर्व नगरपरिषद कर्मचारी, स्वच्छता कर्मचाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते.