विकसित भारत संकल्प यात्रेचे सुभाष चौकात उद्घाटन

0
13

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा नावाची देशव्यापी मोहीम केंद्र व राज्य शासनाकडून १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत आखण्यात आली आहे. विकसित भारत संकल्प यात्रा ही जळगाव शहरात विविध भागात १५ जानेवारी २०२४ ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सोमवारी, १५ जानेवारी रोजी जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत विकसित भारत संकल्पना यात्रा मोहिमेअंतर्गत शहरातील सुभाष चौक येथे जळगाव शहरातील लोकांच्या कल्याणाच्या व विकासाच्या दृष्टीने केंद्र शासन व राज्य शासनाच्यावतीने योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात आला. यावेळी सुभाष चौक येथे विकसित भारत संकल्पना यात्रा मोहिमेच्या चित्ररथ टेलिव्हिजनद्वारे योजना प्रकाशित करण्यात आल्या. यावेळी जळगाव शहराचे आ.राजू मामा भोळे यांनी विकसित भारत यात्रेचे उद्घाटन केले.

याप्रसंगी माजी नगरसेवक, पदाधिकारी, माजी महापौर सुनील खडके, माजी उपमहापौर अश्‍विन सोनवणे, माजी नगरसेवक विशाल त्रिपाठी, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, माजी प्र.सदस्य, माजी सदस्य दीपक सूर्यवंशी, मुकुंद सोनवणे, डॉ.राधेश्‍याम चौधरी, अरविंद देशमुख, जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ.विद्या गायकवाड, अतिरिक्त आयुक्त श्रीमती पल्लवी भागवत, सहाय्यक आयुक्त श्रीमती अश्‍विनी गायकवाड, मुख्य लेखा अधिकारी चंद्रकांत वानखेडे, मुख्य लेखापरीक्षक मारुती मुळे, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे, अभिजीत बाविस्कर, प्रभाग समिती क्रमांक एक ते चारचे प्रभाग अधिकारी नरेंद्र चौधरी, प्रकाश सोनवणे, एस.एस.पाटील, संजय नेवे, जळगाव मनपाचे मान्यवर अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कर्मचारी वर्ग तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.

हा कार्यक्रम उपायुक्त श्रीमती निर्मला गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमात शासनाच्या विविध योजनांची लोकांना माहिती देण्यात आली. श्रीमती गायत्री पाटील शहर अभियान व्यवस्थापक यांनी केले. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त गणेश चाटे, आभार व्यवस्थापक शालिग्राम लहासे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here