साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील बी.पी.कला, एस.एम.ए. विज्ञान आणि के.के.सी. वाणिज्य महाविद्यालयात कॉमर्स असोसिएशनचे उद्घाटन आणि उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.धनंजय वसईकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून हेरंब ऑटोमोबाईल्स प्रा. लिमिटेडचे एम.डी. तथा रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्सचे अध्यक्ष हर्षद ढाके उपस्थित होते.
यावेळी हर्षद ढाके यांनी कॉमर्स असोसिएशनचे उद्घाटन केले. त्यांनी उद्योजक बनणे प्रत्येकास शक्य आहे. उत्तम बिझनेस आयडियासाठी पैशाची आता अडचण नाही, हा विश्वास विद्यार्थ्यांना दिला. विस्तृतपणे उद्योजक का व कसे बनावे, याविषयी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाच्या प्रमुख उपलब्धता व उपक्रमांची माहिती उपप्राचार्य प्रा.धनंजय वसईकर यांनी दिली. पाहुण्यांचा परिचय कार्यक्रम समन्वयक डॉ. राहुल कुळकर्णी यांनी करून दिला. कार्यक्रमाचे व्यवस्थापन प्रा.रमेश पावरा, प्रा.श्रीकांत भंडारी, प्रा.गायत्री तलरेजा, सहाय्यक पृथ्वीराज पाटील यांनी केले. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता. प्रास्ताविक विभाग प्रमुख उपप्राचार्य डॉ. कला खापर्डे यांनी करुन असोसिएशनचे कार्य विशद केले. सूत्रसंचालन डॉ. पूनम निकम तर प्रा. विभा पाटील यांनी आभार मानले.