साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी. पी. आर्टस्, एस. एम. ए. सायन्स अँड के.के.सी. कॉमर्स आणि के. आर. कोतकर ज्युनियर कॉलेजमध्ये कला मंडळाचे उद्घाटन आणि पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर होते. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. अजय काटे, प्रा. डी. एल. वसईकर, उपप्राचार्य डॉ. के.एस.खापर्डे, कला मंडळ प्रमुख डॉ. पंकज नन्नवरे, उत्सव समिती प्रमुख प्रा. अंकुश जाधव आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांनी मनोगतात विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास साधण्याचे कला मंडळ हे एक उत्कृष्ट साधन आहे. कला ही जीवन कसे जगावे, हे शिकविते, असे सांगितले. तसेच पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मनोगत व्यक्त करताना मानवता धर्म सर्व श्रेष्ठ आहे हे सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कलागुणांना कसे जोपासावे, विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे विविध गुण, व्यक्तिमत्व विकास हे कलागुणांमधून साध्य केले जातात, असे राजेंद्र माळी यांनी कलामंडळाचे उद्घाटन करतांना सांगितले.
प्रास्ताविकात डॉ. पंकज नन्नवरे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असणारी कला सादर करून जीवन अगदी सुंदर बनविता येते, असे सांगितले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील समिती सदस्य प्रा. किशोर पाटील, प्रा एम. ओ. अहिरे, प्रा. विभा पाटील, प्रा.पंकज वाघमारे, हेमंत गायकवाड, संजय जाधव, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. एस.वाय. पवार तर प्रा. एम. ओ. अहिरे यांनी आभार मानले.