Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»आसोदा येथे वातानुकुलित जेष्ठ नागरिक भवनाचे लोकार्पण
    जळगाव

    आसोदा येथे वातानुकुलित जेष्ठ नागरिक भवनाचे लोकार्पण

    saimatBy saimatSeptember 29, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ज्येष्ठ मंडळी समाजाचे आधारस्तंभ, संस्काराचा ठेवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी

    वातानुकुलित जेष्ठ नागरिक भवन  हे जेष्ठ नागरिकांना एकत्र येण्यासाठी आणि सुसंवाद साधण्यासाठी एक विरंगुळा केंद्र आहे. आपली वडीलधारी जेष्ठ मंडळी ही आपली संपत्ती असून त्यांचे अनुभव, ज्ञान ही आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. ज्येष्ठ मंडळी ही सुसंस्काराचा ठेवा आणि सर्व समाजाचे आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील आसोदा येथे जेष्ठ नागरिक भवनाचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक संघाचें अध्यक्ष डीगंबर भोळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आ. राजूमामा भोळे होते. पालकमंत्री ना.पाटील पुढे म्हणाले की, जेष्ठांच्या  आयुष्यात आनंद आणि समाधानाचे क्षण आणण्यासाठी या विरंगुळा केंद्राचा उपयोग होई. वातानुकुलित जेष्ठ नागरिक भवनाच्या  कामाला  सुमारे ३५ लक्ष निधी उपलब्ध करून दिला .वडीलधारी मंडळींचे अनुभव आणि ज्ञान हे आपल्यासाठी अमूल्य असून त्यांच्या कष्टांमुळेच  व आशीर्वादामुळे आपण आज इथपर्यंत पोहोचलो आहोत. आसोदा येथील मोठ्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून  लवकरच काम पूर्ण होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .

    डी.पी.डी.सी , शासनाच्या मुलभूत योजनेतर्गत (२५१५) असोदा येथे जेष्ठ नागरिकांसाठी मोठा टी. व्ही., डिश  कनेक्शन, शौचालय बांधकाम , साहित्य व फर्निचरसह जेष्ठ नागरीक भवनाचे  बांधकाम, संरक्षकभिंत  व आवारात पेव्हिंग ब्लॉक बसविणे यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील व आ. राजूमामा भोळे यांनी ३५ लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला  होता.

    याप्रसंगी आ.राजूमामा भोळे, संघाचे अध्यक्ष डीगंबर भोळे, उपाध्यक्ष चिंधू महाजन, सचिव रमेश पाटील,  उपसरपंचपती गिरीश भोळे, सुभाष महाजन, अनिल महाजन. नरेंद्र भंगाळे, डी.एम. सावदेकर, मुकुंदराव नन्नवरे, प्रफुल्ल सावदेकर, तुषार महाजन, किशोर चौधरी , अजय महाजन, सुनील पाटील, अनिल कोळी, शरद नारखेडे, संज्योत कोळी, महेंद्र जोहरे, संदीप नारखेडे, उमेश बाविस्कर, दीपक माळी, संजय बिऱ्हाडे यांच्यासह पदाधिकारी , महिला व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष डीगंबर भोळे  यांनी केले.  सूत्रसंचालन जेष्ठ नागरीक संघाचे  सचिव रमेश पाटील यांनी केले. तर आभार जेष्ठ नागरीक संघाचे उपाध्यक्ष चिंधू महाजन यांनी मानले.चौकट

    ९९ वर्षाच्या आजीचा  पालकमंत्र्यांनी केला सत्कार

    उषा चिंधू महाजन यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवासा निमित्त  अमेरिकेत वास्तव्याला असलेले नितीन महाजन यांनी  ७५ वर्ष पूर्ण झालेल्या २०० जेष्ठांना मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते काठ्या वाटप करण्यात आले. यावेळी ९९ वर्ष वयाच्या आजी गीताबाई येवले यांचा पालकमंत्र्यांनी सत्कार करून  प्रत्येक जेष्ठाशी त्यांच्या  जागेवर जावून संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pachora : पाचोर्‍यात वॉटर हिटरचा शॉक फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू

    March 11, 2026

    Jalgaon: जळगावात वडिलांच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी घरकुल चौकात गोळीबार

    March 11, 2026

    Jalgaon : जळगावात एचपीव्ही लसीकरण मोहिमेची धडक सुरुवात १४ वर्षांखालील मुलींना मोफत लस

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.