सोयगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून केले सादरीकरण
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :
तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवामध्ये सोयगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून सादरीकरण केले. त्यात कै. बाबुरावजी काळे मराठी स्कुलचे दोन गट सहभागी झाले होते. गोंदेगावातील एस.बी. हायस्कुलचा एक गट सहभागी झाला होता. त्यापैकी तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात सोयगावातील कै. बाबुरावजी काळे मराठी स्कुलचा द्वितीय गटाला तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यांचा सादरीकरणाचा विषय ‘ए आय आणि समाज’ होता.
द्वितीय क्रमांकावर एसबी हायस्कुल गोंदेगावचा गट होता. त्यांचा विषय ‘आरोग्य आणि स्वच्छता’ हा होता तर तृतीय क्रमांक कै. बाबुरावजी काळे मराठी स्कुलचा प्रथम गटाला मिळाला. त्यांनी ‘जागतिक जल संकट’ विषयावर सादरीकरण केले. विद्यार्थ्यांचे सादरीकरण परीक्षणासाठी विषय तज्ज्ञ परमेश्वर कठोरे, रामचंद्र महाकाल, अश्विनी पवार यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. तसेच विज्ञान नाटिकेचे परीक्षण केले.
प्रथम क्रमांक मिळालेल्या कै.बाबुरावजी काळे मराठी स्कुलच्या विद्यार्थ्यांचा गटशिक्षणाधिकारी रंगनाथ आढाव, केंद्रप्रमुख फिरोज तडवी, ज्ञानज्योती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश यादव, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलीस, प्रा.डॉ. दादासाहेब पवार, विषय मार्गदर्शक शिक्षक योगेश काळे, जयश्री श्रीवास्तव, सागर घाटे यांनी सत्कार केला. तसेच शिवज्योती शिक्षणप्रसारक मंडळाच्या अध्यक्षा ज्योती काळे, सचिव देविना काळे, संचालिका सुनयना काळे, संस्था प्रतिनिधी प्रा.कमलेश काळे, संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. शिरीष पवार यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.