Taekwondo Competition : राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत निकिता पवारला सुवर्णपदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान

0
2

महाराष्ट्र संघात राष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी नवीन प्रेरणा मिळणार

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धांमध्ये जळगावच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन, जैन स्पोर्टस् अकॅडमी आणि नंदिनीबाई महाविद्यालयाची विद्यार्थिनी निकिता पवार हिने १९ वर्षाखालील मुलींच्या ५५ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. तिच्या यशामुळे तिला जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघात स्थान निश्चित झाले आहे. जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील यशामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढेल आणि महाराष्ट्र संघात राष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी नवीन प्रेरणा मिळणार आहे.

स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्यांमध्ये देवयानी पाटील (नूतन मराठा विद्यालय, ४२ किलो वजन गट), स्पर्श मोहिते (अनुभूती निवासी स्कुल) अशा दोनही विद्यार्थिनींचा समावेश आहे. १७ वर्ष वयोगटात मुलांमध्ये, मयूर पाटीलने कांस्यपदक मिळवले. सर्व विजेत्यांना प्रशिक्षक जयेश बाविस्कर आणि मुख्य प्रशिक्षक अजित घारगे यांच्याकडून प्रमुख मार्गदर्शन लाभले.

सर्व विजेत्यांचे जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, खजिनदार सुरेश खैरनार, सचिव अजित घारगे, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, सदस्य नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, सौरभ चौबे, जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here