Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भुसावळ»शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धेत ३५० विद्यार्थ्यांनी केले पाठ्यपुस्तकाचे अभिवाचन
    भुसावळ

    शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धेत ३५० विद्यार्थ्यांनी केले पाठ्यपुस्तकाचे अभिवाचन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoFebruary 18, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

    येथील म्युनिसिपल हायस्कुलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवजयंतीचे औचित्य साधून इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती पाठ्यपुस्तक अभिवाचन स्पर्धेत शहरासह तालुक्यातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र तर पाच गटातून २० विजेत्यांना सन्मानचिन्हासह प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण सभापती राजेंद्र आवटे, मुख्याध्यापक ललितकुमार फिरके, माजी नगरसेवक दीपक धांडे, योगविद्या समितीच्या प्रभारी महानंदा पाटील, वेलनेस फाउंडेशनचे प्रा. निलेश गोरे, भूलतज्ज्ञ डॉ. मिलिंद धांडे, संस्थाध्यक्ष दंगल पाटील, समन्वयक संजीव पाटील, सचिव डॉ. जगदीश पाटील उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.

    यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शिक्षणशास्त्रात नेट उत्तीर्ण झाल्याबद्दल डॉ. जगदीश पाटील यांचा म्युनिसिपल हायस्कुलतर्फे मुख्याध्यापक ललितकुमार फिरके यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगत युवराज लोणारी यांनी मांडले.

    अभिवाचन स्पर्धेविषयी डॉ. जगदीश पाटील यांनी माहिती देऊन स्पर्धेसाठी वर्गवार बसण्याचे नियोजन सांगितले. त्यानुसार सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी आपापल्या गटातील वर्गात अभिवाचन स्पर्धेत सादरीकरण केले. त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी महेंद्रसिंग ठाकूर (पिंटू) होते. यावेळी माजी नगरसेवक नितीन धांडे, मुख्याध्यापक ललितकुमार फिरके, सामाजिक कार्यकर्ते रूपेश देशमुख, वेलनेस फाउंडेशनचे प्रा. निलेश गोरे, प्रा. तेजस्वी महाजन उपस्थित होते. विजेत्यांसह परीक्षकांना स्मृतीचिन्हासह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक दंगल पाटील, सूत्रसंचालन डॉ. जगदीश पाटील तर आभार संजीव पाटील यांनी मानले.

    स्पर्धेत संजय ताडेकर, हेमांगिनी चौधरी, विजय वाघ, संध्या धांडे, प्रा. तेजस्वी महाजन, प्रा.निलेश गोरे, शिशीर जावळे, डॉ. मिलिंद धांडे, नीलिमा जोशी, दीपमाला पाटील, संध्या भोळे, शैलेंद्र वासकर, शैलेंद्र महाजन, बी.बी. जोगी, डॉ. नरेंद्र महाले, प्रदीप साखरे, मालती भिरूड आदी परीक्षकांनी मूल्यमापन केले.

    पाच गटातील २० विजेते असे

    पहिल्या गटात प्रथम भुवनेश निळे, प्रांजल चौधरी, द्वितीय तोशिष पाटील, हर्षा बारी, तृतीय गुंजन राणे, वृंदा पाटील, उत्तेजनार्थ श्रद्धा घ्यार, नेहा बारी. दुसऱ्या गटात प्रथम हंसिका महाले, सोनाक्षी प्रजापती, द्वितीय ज्ञानेश्‍वरी नेहेते, वरद फेगडे, तृतीय मानस पाटील, साम्यता खंडेराव, उत्तेजनार्थ समृद्धी वाघ, रेणुका क्षीरसागर. तिसऱ्या गटात प्रथम गौरी अहिर, द्वितीय आकांक्षा पाटील, तृतीय कल्याणी पाटील, उत्तेजनार्थ लिंसीका पाटील यांचा समावेश आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Bhusawal : साकेगाव येथील नवोदय विद्यालयाच्या सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल आढावा

    February 5, 2026

    Bhusawal : १० लाखांची आर्थिक फसवणूक आणि धमक्या

    February 4, 2026

    Bhusawal : संतोषी माता सभागृहाचा ताबा भुसावळ नगरपालिकेकडे

    February 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.