महादेवाला १०८ बेलपत्र अर्पण करून पंचामृताने पूजा ; बुधवारी कावड यात्रा निघणार
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी पहाटेपासून भाविकांनी सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. सकाळी महादेवाच्या शिवलिंगाला जल, दुग्ध त्यानंतर पंचामृताने अभिषेक, नऊ जोडप्यांच्या हस्ते पूजा केल्यानंतर १०८ बेलपत्र महादेवाला अर्पण करून महाआरती करण्यात आली. दिवसभरातून २०० भाविकांनी जागृत स्वयंभू महादेवाचे दर्शन घेतले. पिंप्राळा परिसरातील भव्य जागृत स्वयंभू महादेव मंदिर आहे. भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने मंदिरात मोठ्या संख्येने गर्दी होते. त्यामुळे “हर हर महादेव आणि बम बम भोले” च्या घोषणांनी परिसर दणाणला होता. त्यानंतर पेढे, केळी, राजगिऱ्याच्या लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. बुधवारी, ६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता कावड यात्रा निघणार आहे.
पूजा करणाऱ्या जोडप्यांमध्ये- सोनू-प्रियंका शर्मा, राकेश-पूजा पाटील, श्रीकांत-आशा सुपेकर, राजेंद्र-सीमा पाटील, हेमंत-पूनम सूर्यवंशी, योगेश – रेणू पांडे, लोकेश-रोशनी शर्मा, पंकज-कल्याणी राजपूत, गणेश-दीपिका जाधव यांचा समावेश होता. यावेळी नरेश बागडे, गणेश सुपेकर, मधुकर ठाकरे, विठ्ठल जाधव, सरदार राजपूत, विजय भावसार, पंकज राजपूत तसेच महिला उपस्थित होते.
कावडयात्रेत भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन
सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिर येथून सावखेडा गिरणा नदीतून तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन पिंप्राळा परिसरातील वटूकेश्वर महादेव, ओंकारेश्वर महादेव, नर्मदेश्वर महादेव, अर्ध नारेश्वर महादेव, ओंकारेश्वर महादेव तसेच पिंप्राळा परिसरातील महादेव मंदिरातील शिवलिंगावर जल अर्पण करणार आहेत. कावड यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नरेश बागडे यांनी केले आहे.