शाळेच्या परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्त काढली प्रभात फेरी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनीत स्थित किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेज, मेहरुण येथे शुक्रवारी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. तुषार फिरके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मनपाच्या माजी महापौर जयश्रीताई महाजन, ज्ञानेश्वर नाईक, मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील आदी मान्यवर, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. “हर घर तिरंगा अभियानांतर्गत” ४ थी व ८ वीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर “कवायत संचलन” केले.
यावेळी विद्यालयातील हितल हटकर, भार्गवी पाटील, करुणा सपकाळे, सुप्रिया सुळे, रिंकू तडवी, अनिकेत पाटील, सुजाता जगदेव, मानसी पाटील आदी विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन एस.एस.सुरवाडे तर आभार व्ही.डी.नेहेते यांनी मानले.यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.