वरुणराजाच्या हजेरीत ; शेंदुर्णीच्या भक्तीसागरात भाविक निघाले न्हाऊन

0
20

शेंदुर्णी : प्रतिनिधी साईमत लाईव्ह

खानदेश चे प्रति पंढरपूर म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या व भगवान श्री त्रिविक्रम महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या शेंदुर्णी एकादशीला लाखो भाविकांनी दोन वर्षानंतर भगवंताचे नयन मनोहर रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यानिमित्ताने विविध संख्या, पतसंस्था ,नगरपंचायत,राष्ट्रीय, विद्यार्थी परिषद , सामाजिक राजकीय संस्था संघटना , नगरसेवक यांच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी फराळ चहा, दूध, केळी, वाटप करण्यात आले.

सकाळी महापूजा व अभिषेक
रात्री अकरा वाजता आमदार गिरीश महाजन, जामनेरच्या नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन, शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गरुड, जिल्हा परिषदेच्या सदस्य सरोजिनीताई गरुड, पं दिनदयालाजी उपाध्यक्ष पत संस्थेचे चेअरमन अमृत खलसे, शेंदुर्णीच्या नगराध्यक्ष सौ विजयाताई खलसे, तसेच संत श्रेष्ठ कडोजी महाराज यांनी महापूजा व अभिषेक केला.या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, उपनगराध्यक्ष निलेश थोरात, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, गट नेत्या सौ रंजना धुमाळ, डॉक्टर हेडगेवार शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर कौमुदी साने, ह.भ. प. कडोबा माळी, पंडितराव जोहरे, तसेच नगरसेवक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. अतिशय सुंदर नयन मनोहर भगवान श्री विक्रम महाराजांचे मूर्तीचे तेज आज अधिकच खुलून दिसत होते. पितांबर परिधान केलेले दाग दागिने घातलेल्या व सभोवताली सुंदर फुलांचे महाराज यामुळे डोळ्यांचे पारण फेटल्याचे समाधान भाविक उरी साठवत होते. सकाळी तसेच दुपारी वरून राजाचे जोरदार आगमन झाले. यांना भाविकांचे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली होती. तब्बल एक दीड किलोमीटरवर भाविकांचे दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या जागोजागी फराळ चहा, दूध, केळी, वाटप करण्यात येत होते पंचक्रोशीतील असंख्य भाविकांसह दाखल झाल्या यांना शेंदुर्णीत मुस्लिम बांधवांनी बकरीची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला होता यामुळे सामाजिक एक्य सलोखा निर्माण झाला. काही मुस्लिम संख्या युवक यांनी भाविकांना फराळाचे वाटप केले.

चौक बंदोबस्त
आषाढी एकादशीला यंदा पहुरचे पोलीस निरीक्षण प्रताप इंगळे यांनी कल्पकतेने व्यवस्थित बॅरिकेट, विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त बाहेर पार्किंगची व्यवस्था वेळोवेळी ध्वनी क्षेपणावरून भाविकांना आव्हान करण्यात येत होते. पोउपणी संजय बनसोड, दिलीप पाटील, अमोल गर्जे या अधिकारी वर्गासोबतच बाहेरून आलेल्या अधिकारी पहुर अन्य ठिकाणाहून आलेले पोलीस बांधव होमगार्ड यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. अभावी च्या स्वयंसेवकांनी तसेच पोलीस मित्र काही युवक सुरक्षा रक्षक म्हणून आपली सेवा केली. स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने धार्मिक बाबींची माहिती देणारा स्टॉल लावला होता. नगरपंचायतीचे वतीने मंडळ यांची दिंडी आली होती. नगरपंचायतीची वतीने दिवसभर शहरातील साफसफाई करण्यात आली. रात्री श्री त्रिविक्रम महाराज संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थांचे गादीवारच ह. भ. प. शांताराम महाराज भगत यांचे पारंपारिक कीर्तन झाले.

दोन वर्षाच्या नंतर भगवंताचे दर्शन मिळाल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली तसेच मुस्लिम समाजाच्या निर्णयामुळे जातील धार्मिक सलोखा निर्माण होण्यास मदत झाली व मंदिराच्या आवारात प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय सुविधा होती. तीन प्रकारात भगवान श्री त्रिविक्रम महाराजांचे दर्शन घेतले तर साक्षात पंढरपूरच्या विठ्ठलाचे पांडुरंगाचे दर्शन झाल्याने समाधान लागते यामुळे रात्रीपर्यंत शांतते उस्थावा भावीक दर्शन घेत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here