Poetry Collection ‘Balgunjan’ : ‘बालगुंजन’ कवितासंग्रहात मांडल्याहेत बालकांच्या मनातल्या ‘गूज गोष्टी’

0
21

कवितासंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांचे मत

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

कुटुंब व्यवस्थेतील हरवत जाणारा संवाद आणि बोलका होणारा भ्रमणध्वनी समाजमनाला आज आव्हानात्मक दिशा देऊ पाहत आहे. अशावेळी पिढी जात संस्कृतीचा वारसा जपण्याची गरज आहे. ‘बालगुंजन’ कवितासंग्रह बालकांच्या मनातल्या गूज गोष्टी मांडत असल्याचे मत अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी व्यक्त केले. बाल निरीक्षणगृहात आयोजित सुनिता नारखेडे-येवले लिखित अथर्व पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या ‘बालगुंजन’ कवितासंग्रहाच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कवयित्री माया धुप्पड होते. प्रमुख पाहुणे म्हणून भीम रमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल, बालगृह अधीक्षक रवीकिरण अहिरराव, अथर्व पब्लिकेशनचे युवराज माळी, चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ.नितीन विसपुते आदी उपस्थित होते.

बालकांच्या एकूणच दैनंदिनी ही आजच्या काळात बदलत जाणारी आहे. पालकांनी चिमुकल्यांच्या हातात रडणे थांबविण्यासाठी दिलेला मोबाईल आज त्याचे भविष्य अंध:कारमय करू पाहत आहे. त्यासाठी कुटुंब व्यवस्थेत सजगता येण्याची गरज असल्याचे मत अध्यक्षस्थानावरून कवयित्री माया धुप्पड यांनी मांडले. त्यांनी याप्रसंगी आपल्या बालकविता सादर केल्या. नव्या पिढीला आजी-आजोबा दुरापास्त झाले आहेत. सद्यस्थितीला एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होत आहे. विभक्त कुटुंब पद्धती वेगाने मार्गक्रमण करत आहे. त्यात असणारा धोका नेमका संस्कारांचा अभाव आहे. त्यामुळेच समाज पद्धती आता बदलू पाहत आहे, हे निश्चितपणे नात्यात दुरावा निर्माण करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे मत डॉ. मिलिंद बागुल यांनी व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती

कार्यक्रमाला पी. झेड.नारखेडे, सागर येवले, दीक्षा येवले, श्रुती येवले, तुषार वाघुळदे, संजय पाटील, संजय येवले, योगिनी येवले, प्रकाश येवले, विद्यार्थी, विद्यार्थांनी, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक कवयित्री सुनिता नारखेडे-येवले, सूत्रसंचालन करुणा महाले तर आभार प्रवीण पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here