Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»‘न्यू होम मिनिस्टर’ कार्यक्रमात महिला वर्गाची धमाल, हजारो महिलांचा सहभाग
    पाचोरा

    ‘न्यू होम मिनिस्टर’ कार्यक्रमात महिला वर्गाची धमाल, हजारो महिलांचा सहभाग

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoFebruary 3, 2024No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

    शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्यावतीने ‘न्यू होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याला हजारो महिलांनी स्वयंस्फूर्तीने हजेरी लावून कार्यक्रमाचा आनंद लुटला. याप्रसंगी विविध गाण्यांसह स्पर्धांमधून पाचोरा-भडगाव मतदारसंघातील परिवर्तनाचा नारा बुलंद करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रधार क्रांतीनाना व त्यांची कन्या सह्याद्री यांनी सादर केलेल्या ‘शिवसेनेची मशाल निशाणी ठेवा लक्षात…वैशालीताईना पाठवा तुम्ही विधानभवनात’ गाण्याला महिलांकडून जोरदार दाद मिळाली.

    पाचोरा येथील माताश्री कैलादेवी मंदिरा शेजारी ‘न्यू होम मिनिस्टर’ खेळ पैठणीच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रारंभी सिने बाल कलाकार सह्याद्री मळेगावकर हिने कार्यक्रमाची सुरूवात केली. याप्रसंगी वैशाली सूर्यवंशी यांचे जोरदार जयघोष आणि उर्जावान संगीताचा ताल सुरू असतांना हजारो महिलांच्या उपस्थितीत वैशाली सूर्यवंशी यांचे आगमन झाले.

    यानंतर सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर, वैशाली सूर्यवंशी, महानंदा पाटील, कमल पाटील, तिलोत्तमा मौर्य आदी मान्यवरांच्या हस्ते महापुरूषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. पाचोरा येथील उद्योजक तथा व्यावसायिक मुकुंद बिल्दीकर यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यामुळे कार्यक्रम सुरू होण्याआधी त्यांना उपस्थितांनी दोन मिनिटे मौन बाळगून आदरांजली अर्पण केली. यानंतर वैशाली सूर्यवंशी यांच्याहस्ते क्रांतीनाना मळेगावकर आणि सह्याद्री मळेगावकर यांचा सत्कार करण्यात आला. श्रीगणेश व साई वंदनेने कार्यक्रमाला प्रारंभ झाला आणि उत्तरोत्तर कार्यक्रमाची रंगत वाढतच गेली.

    ‘लय भारी, लय भारी… ह्यो होम मिनीस्टर लय भारी’ या थीम साँगने कार्यक्रमाची अतिशय जबरदस्त जल्लोषात सुरूवात झाली. क्रांतीनाना मळेगावकर हे थेट प्रेक्षकांमध्ये शिरल्यावर त्यांना अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पहिल्यांदा त्यांनी लग्नाला एक ते पाच वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना स्टेजवर बोलावले. यानंतर क्रमाक्रमाने वर्षे वाढवून महिलांना आमंत्रित केले. त्यातून व्यासपीठावर शेकडो महिला दाखल झाल्या असता त्यांना उखाणा घेण्यास सांगितले. यावेळी अतिशय भन्नाट विनोदी किस्से घडले. यानंतर उपस्थित महिलांनी व्यासपीठावर तळ्यात-मळ्यात स्पर्धेत सहभाग घेतला. त्यात अनेक स्पर्धकांची तारांबळ उडाली असता उपस्थितांनी त्यांना जोरदार दाद दिली. त्यातून एकेक स्पर्धक बाद होत मोजके स्पर्धक उरले. यानंतर संगीतावरून गाणे ओळखून त्यावरून नृत्य करण्याचा परफॉर्मन्स झाला. त्यात ६७ वर्षाच्या स्पर्धक महिलेस सोन्याची नथ पारितोषिक म्हणून देण्यात आले.

    यानंतर व्यासपीठावर पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात वैशालीताईना पाचारण करण्यात आले. याप्रसंगी क्रांतीनाना मळेगावकर यांनी वैशालीताई यांच्यावर रचलेले ‘शिवसेनेची मशाल निशाणी ठेवा तुम्ही लक्षात वैशालीताईना पाठवा तुम्ही विधानभवनात’ हे जोशीले गाणे सादर केल्यावर त्याला जोरदार दाद मिळाली. यानंतर फुगे फुगवून आधी टोचून तर नंतर हाताने फोडण्याची अतिशय धमाल स्पर्धा सुरू झाली. त्यातील विनोदी किस्से घडतांना पाहून उपस्थितांनी जोरदार हशा आणि टाळ्यांच्या गजरात दाद दिली. त्यातील विजेत्यांना पैठणी तर एका महिलेस सोन्याची नथ पारितोषिकाच्या स्वरूपात देण्यात आली.

    शेवटच्या टप्प्यात विविध गाण्यांवर बहारदार नृत्य सादर करण्यात आले. याप्रसंगी स्वत: वैशाली सूर्यवंशी यांनी ठेका धरल्याने उपस्थितांच्या उत्साहाला उधाण आले होते. यावेळी स्नेहा पवार, बेबी पाटील, ज्योती बोरसे, अनिता जाधव, साक्षी पैलवान, इरफान शेख इस्माईल, छाया माहेश्‍वरी, आशा भुजंग, प्रतिभा पाटील आदी कर्तबगार महिलांचा वैशाली सूर्यवंशी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

    कार्यक्रमाच्या शेवटी वैशाली सूर्यवंशी म्हणाल्या की, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा वसा घेऊन मी पुढे चालली आहे. प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेला पाचोरा तर चार तारखेला भडगावात मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात येते. माझ्या वडिलांच्या विचारांचा व तत्वाचा वारसा पुढे घेऊन जात असून विकासाची मशाल प्रज्ज्वलीत ठेवण्यासाठी आपली साथ आवश्‍यक असल्याचे आवाहन त्यांनी केले.

    चार तास रंगला कार्यक्रम

    यानंतर होम मिनिस्टरची मुख्य स्पर्धा पार पडली. त्यात तोंडाने फुगा फुगवून तो आधी फोडण्याचे आव्हान करण्यात आले. त्यातील विजेत्यांना अनुक्रमे एलईडी टिव्ही, पिठाची गिरणी, गॅस शेगडी, मिक्सर, इस्त्री आदींची बक्षीसे देण्यात आली. त्यातील पहिली दोन्ही बक्षिसे ज्या महिलांनी पटकावली त्या दोन्हींचे पती मयत आहेत. त्यामुळे त्या आपल्या संसाराचा गाडा ओढत आहेत. त्यामुळे पारितोषिके स्वीकारतांना त्यांचे अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या जिद्दीला उपस्थितांनी जोरदार दाद दिली. हा कार्यक्रम सुमारे चार तासापर्यंत चांगलाच रंगला. त्याला पाचोरा शहरासह तालुक्यातील हजारो महिलांनी उपस्थिती दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.