Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली अनेकांना लावला लाखोंचा चुना
    क्राईम

    ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली अनेकांना लावला लाखोंचा चुना

    saimatBy saimatOctober 4, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ११ लाख ८२ हजार रुपयांचा घातला गंडा, सायबर पोलिसात गुन्हा दाखल

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी

    तालुक्यातील ऑनलाईन फसवणुकीच्या घटना मोठ्या वाढल्या आहेत.ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली अनेकांना लाखोंचा चुना लावला जात असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहे. आता असाच एक प्रकार जळगावमधून समोर आला आहे. शेअर मार्केटमध्ये चांगल्या नफ्याचे आमिष दाखवून संजय राजाराम वसतकार (वय ४२, रा. एसएमआयटी कॉलेज) यांना ११ लाख ८२ हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी वसतकार यांच्या तक्रारीनुसार सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

    एसएमआयटी कॉलेज परिसरातील संजय वसतकार हे ऑनलाइन ट्रेडिंग करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. जुलैत त्यांना एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड केले होते. त्या ग्रुपमध्येअ‍ॅडमिन नारायण जिंदाल व चिन्मयी रेड्डी नामक व्यक्तींनी शेअर मार्केटमध्ये कोणते शेअर कधी खरेदी करावे, कोणत्या शेअरमध्ये पैसे गुंतवले तर अधिक फायदा होईल, याची माहिती शेअर केली होती.

    सप्टेंबरच्या सुरुवातील चिन्मयीने वसतकार यांना शेअर मार्केटमध्ये नफा देणाऱ्या कंपन्या आहेत असे सांगून कोटक नावाचे अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. नंतर १० लाख रुपये गुंतवण्यास सांगितले. वसतकार यांनी रक्कम गुंतवल्यावर त्यांना २ लाख ८२ हजार रुपयांचा नफा दिसू लागला. परंतु नंतर आणखी एक शेअर घेण्यास त्यांना चिन्मयीने आठ लाख रुपयाचे कर्ज घेण्यास भाग पडले. १४ सप्टेंबर रोजी वसतकार यांना चिन्मयीने मेसेज पाठवून कर्ज फेडा तरच तुम्हाल नफ्याची रक्कम मिळेल, असे सांगितले.

    काही दिवसांनंतर गुंतवणुकीवर झालेल्या नफ्याची रक्कम काढता येत नसल्याचे संजय वसतकार यांच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे कळताच तत्काळ त्यांनी सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यावरून नारायण जिंदल व चिन्मई रेड्डी या दोघांविरुद्ध सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगावात एलपीजीचा तीव्र तुटवडा गॅससाठी रिक्षांच्या किलोमीटर लांब रांगा, चालकांचे हाल

    March 12, 2026

    Pachora : पाचोर्‍यात वॉटर हिटरचा शॉक फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू

    March 11, 2026

    Jalgaon: जळगावात वडिलांच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी घरकुल चौकात गोळीबार

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.