साईमत, तळोदा : प्रतिनिधी
येथील नेमसुशिल माध्यमिक विद्यामंदिर येथे माध्यमिक मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर होते. सुरवातीला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रवींद्र गुरव, सेवानिवृत्त प्राचार्य अजित टवाळे, मुख्याध्यापक सी.एम.पाटील, जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त सुनील परदेशी यांचा सत्कार केला.
सभेत गटशिक्षणाधिकारी यांनी विविध शैक्षणिक योजनेचा आढावा घेतला. तसेच मानव विकास मिशन योजना, सेवा हमी कायदा, विद्यार्थ्यांच्या नावात, जन्म तारखेत बदल करणे अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव यांनी एमडीएम, सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती, मोफत पाठ्यपस्तके योजना यांचे रेकॉर्ड कसे ठेवावे, याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी तालुका मुख्याध्यापक संघाची नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. याप्रसंगी भास्कर मराठे, भरत पाटील, योगेश पाटील, किसन बारेला, संजय बागुल, शेरसिंग पाडवी, नरोत्तम मराठे, निलेश सूर्यवंशी आदी मुख्याध्यापक उपस्थित होते. प्रास्ताविक संघाचे तालुकाध्यक्ष निमेश सूर्यवंशी तर एन.व्ही.मराठे यांनी आभार मानले.
कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी निमेश सूर्यवंशी
तळोदा तालुका मुख्याध्यापक संघाची नूतन कार्यकारिणी अशी अध्यक्षपदी निमेश विष्णुपंत सूर्यवंशी, सचिव सुनील सुदाम परदेशी, उपाध्यक्ष भास्कर दत्तू मराठे, उपाध्यक्ष योगेश संजय पाटील, कोषाध्यक्ष भरत उध्दव पाटील, विद्यासचिव निलेश जीवन सूर्यवंशी, ऑडिटर संजय भिका बागुल, प्रसिध्दीप्रमुख किसन संपत बारेला, सहसचिव नरोत्तम वामन मराठे, सहविद्यासचिव शेरसिंग गणपतसिग पाडवी, सहकोष्याध्यक्ष कालुसिंग मोग्या पाडवी, आश्रमशाळा प्रतिनिधी प्रकाश ढोमण साळुंखे, महिला प्रतिनिधी श्रीमती प्रतिभा देवाजी मराठे
तर कार्यकारिणी सदस्यांमध्ये शेख इकबाल शेख उमर, शेख इस्माईल शेख गणी पिंजारी सल्लागार म्हणून अजित हिरालाल टवाळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक छोटु मंगा पाटील यांचा समावेश आहे.