सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
रोटरी क्लब जळगावतर्फे जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त आयोजित ‘वारसा’ फोटो प्रदर्शन स्पर्धेत वृत्तपत्र छायाचित्रकार गटात संधीपाल वानखेडे प्रथम क्रमांकाचे विजेते मानकरी ठरले तर छायाचित्रकार सुमित देशमुख, सचिन पाटील यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये खा.स्मिता वाघ यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, मानद सचिव सुभाष अमळनेरकर, पब्लिक इमेज कमिटी चेअरमन तथा प्रोजेक्ट चेअरमन राजेश यावलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी खा.वाघ यांच्या हस्ते हौशी गटातील विजेते छायाचित्रकार प्रथम तुषार मानकर, द्वितीय विशाल चौधरी (अमळनेर), तृतीय केतन महाजन आणि उत्तेजनार्थ जे.पी. वानखेडे तर वृत्तपत्र छायाचित्रकार गटातील उत्तेजनार्थ बक्षीस प्रकाश जगताप यांना देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण आनंद मल्हारा, तुषार बुंदे, प्रमोद घोडके यांनी केले. त्यांच्यावतीने आनंद मल्हारा यांनी तर छायाचित्रकारांच्यावतीने सुमित देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
सन्मानपत्र देऊन छायाचित्रकारांचा गौरव
कार्यक्रमात विजेत्या वृत्तपत्र छायाचित्रकारांसह आबा मकासरे, नितीन सोनवणे, गोकुळ सोनार, मुबारक तडवी, भूषण हंसकर यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.पारितोषकांची घोषणा रोटरी क्लब जळगावचे माजी अध्यक्ष प्रा. पूनम मानुधने, राघवेंद्र काबरा, डॉ. जयंत जहागीरदार, ॲड. प्रवीणचंद्र जंगले, जितेंद्र ढाके, ॲड. सागर चित्रे, माजी सचिव प्रा. शुभदा कुलकर्णी, डॉ. मिलिंद वायकोळे यांनी केली. प्रास्ताविक गिरीश कुलकर्णी, सूत्रसंचालन राजेश यावलकर तर आभार सुभाष अमळनेरकर यांनी मानले.