जिल्हास्तरीय मनपा खो-खो स्पर्धेत सिध्दीविनायक व स्वामी विवेकानंद महाविद्यालय विजयी

0
14

साईमत : जळगाव : प्रतिनिधी

क्रीडा व युवक सेवा संचलनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी,कार्यालय,जिल्हा क्रीडा परिषद,जळगाव व जळगाव शहर महानगरपालिका,जळगाव द्वारा आयोजित,जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनच्या सहकार्याने,जळगाव जिल्हा क्रीडा संघ,येथे पार पडत असलेल्या जिल्हास्तर शालेय खो-खो स्पर्धेत मुलांमध्ये सिध्दीविनायक कनिष्ठ महाविद्यालय तर मुलींमध्ये स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने विजेतेपद प्राप्त केले.

मुलांच्या चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात सिध्दीविनायक कनिष्ठ महाविद्यालयाने आर.आर.कनिष्ठ महाविद्यालयाचा पराभव करत विजेतेपद प्राप्त केले,आर.आर.कनिष्ठ महाविद्यालयास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले,तृतीयस्थानी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने यश प्राप्त केले,तर मुलींमध्ये स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाने जी.डी.बेंडाळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघास पराभूत करीत विजेतेपद प्राप्त केले तर जी.डी.बेंडाळे कनिष्ठ महाविद्यालयास उपविजेतेपद प्राप्त केले.
स्पर्धेचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले,कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गणपतराव पोळ,म.न.पा.क्रीडा अधिकारी दिनानाथ भामरे,जिल्हा क्रीडा अधिकारी रवि नाईक,शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त किशोर चौधरी,तालुका क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण,राज्य खो-खो संघटनेचे सहसचिव जयांशु पोळ,खो-खो मार्गदर्शक मिनल थोरात,जिल्हा खो-खो संघटनेचे सचिव राहुल पोळ,समिधा सोहनी आदि उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी दिलीप सुर्यवंशी, अनिल माकडे, दत्ता महाजन, विशाल पाटील, दिलीप चौधरी, प्रेमचंद चौधरी, तुषार सोनवणे, निरंजन ढाके, छगन मुखडे, गोपाल पवार, महेश पाटील, हर्षल बेडीस्कर, विजय क्षीरसागर, स्वप्निल पवार, केतन चौधरी आदिंनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे सुत्रसंचलन विद्या कलंत्री यांनी केले तर आभार जयांशु पोळ यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here