वादविवाद स्पर्धेत पो.ह. डॉ.शरद पाटील तृतीय

0
16

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

नाशिक पोलीस परिक्षेत्रीयतर्फे झालेल्या वादविवाद स्पर्धेत पो.ह. डॉ.शरद पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्याबद्दल अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला. मानव अधिकार जनजागृती प्रित्यर्थ नाशिक पोलीस परिक्षेत्रीय वाद विवाद स्पर्धा विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्या कार्यालयात आयोजित केली होती. त्यात जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पो.ह. डॉ.शरद पाटील यांनी प्रतिनिधीत्त्व केले. स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. त्यांनी जळगाव जिल्हा पोलीस दलाचे नाव लौकिकात भर पाडली आहे.

डॉ.शरद पाटील यांनी केलेल्या अविस्मरणीय कामगिरीचा सन्मान म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदार यांच्या उपस्थितीत डॉ.शरद पाटील यांचा सत्कार केला. आपल्या अधिनस्थ अंमलदारने केलेल्या कामगिरीचा यथोचित सन्मान केला.

पोलीस खात्यात काम करतांना स्वतःला अद्ययावत ठेवणे अत्यंत कठीण गोष्ट आहे. अशाही परिस्थितीत डॉ.शरद पाटील यांच्यासारखे हिरे स्वयंप्रकाशाने चमकतात. ही केवळ आपल्यासाठी नाही तर पोलीस खात्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याचा सार्थ अभिमान आहे. ‘पोलीस स्टेशनचा तू गौरव आहेस’, अशा शब्दात नावलौकिक करून सोबतच्या अंमलदारांना प्रेरणा दिली असल्याचे विजय शिंदे यांनी सांगितले. याप्रसंगी सर्व अधिकारी, अंमलदार यांच्या चेहऱ्यावर आपल्या सोबतच्या अंमलदाराने केलेल्या कामगिरीमुळे एक वेगळा उत्साह दिसून आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here