साईमत मलकापूर प्रतिनिधी
गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मलकापूर शहरात दि.२५ सप्टेंबर रोजी खामगाव येथील अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांचे मार्गदर्शनात रूट मार्च आयोजन करण्यात आले.
सदर रूट मार्च मलकापूर शहर पोलीस स्टेशन, तहसील चौक, चार खंबा चौक, आठवडी बाजार, निमवाडी चौक, गांधी चौक, छोटा बाजार चौकी, नसवाला चौक, लखानी चौक, बाजीप्रभू नगर, संताजी मंगल कार्यालय, अब्दुल हमीद चौक, चांडक विद्यालय, गाडगे महाराज टी पॉइंट, हनुमान चौक, तहसील चौक व पुन्हा पोलीस स्टेशन अशा रस्त्याने काढण्यात आला.
एसडीपीओ मलकापूर, पोलीस निरीक्षक मलकापूर शहर, पोलीस निरीक्षक आरटीपीएस अकोला, असे १४ पोलीस अधिकारी व पोलीस स्टेशन मलकापूर शहर, मलकापूर ग्रामीण, एमआयडीसी, पोलीस स्टेशन नांदुरा, पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार तसेच होमगार्ड एसआरपीएफ, आरसीपी प्लाटून खामगाव व मलकापूर आदी असे १५१ पोलीस अमलदार रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते.