साईमत जळगाव प्रतिनिधी
श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा झाला. त्यात विविध विद्याशाखांच्या शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदविला व आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.के. पटनाईक, उपप्राचार्य डॉ. एस. बी. पवार, कार्यक्रमाचे संयोजक प्रा अमोल वाणी, सूत्रसंचालक प्रा एन एम काझी उपस्थित होते. २००३ साली इलेक्ट्रॉनिक्स विषयात महाविद्यालयातून पदवी घेतलेले व सध्या लंडन येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ संचालक असलेले आशिषकुमार पांडे हे मुख्य अतिथी म्हणून व २००५ साली महाविद्यालयातील संगणक विषयातून उत्तीर्ण झालेले व आता सिडनी येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर कार्यरत ज्वालीन सोनावाला हे अनुक्रमे इंग्लंड व ऑस्ट्रेलियाहून कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. यावेळी डॉ एम पी देशमुख , मनोज पाटील, वी एस पवार या विभागप्रमुखांची देखील उपस्थिती लाभली.
यावेळी डॉ. रमजान खाटीक, सीमा जोशी परांजपे, दिलीप पोरवाल, अनंत वावरे, कल्याण दानी, नरेंद्र सिंग ढिंसा, हर्षा देशमुख, प्रमोद जाधव, नितीन महाजन, अनिल मोरे, निहार रंजन, निलेश सूर्यवंशी या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले व महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर आपल्या गुरुजनांबद्दल आदरभाव व्यक्त करतांना त्यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील काही मनोरंजक गोष्टी सांगितल्या. प्रा. प्रवीण पाटील यांनी आभारप्रदर्शन केले.
यशस्वीतेसाठी सुनीता पाटील, प्रीती शर्मा, ज्योती माळी, मीनाक्षी बारी, साक्षी बनिया, यशश्री चौधरी, डॉ रिचा मोदियानी, डी के किरंगे, तन्वीर खाटीक, स्वप्नील निकम आदींनी परिश्रम घेतले.