नागरिकांचा ऊबदार कपडे खरेदीवर भर
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी
शहरासह तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अचानक थंडीत वाढ झाली आहे. गुरुवारी थंडीचा कडाका सायंकाळी पाच वाजेपासून सुरू होता.त्यामुळे शहरात तसेच ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या होत्या. ठिकठिकाणी शेकोट्या सुरु झाल्याने जुन्या काळासारखी चावडी सुरू झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. दरम्यान, तालुक्यातील ग्रामीण भागातही थंडीची वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक उबदार कपडे खरेदी करण्यावर भर देत आहे.
सोयगावसह ग्रामीण भागात वाढलेली थंडी रब्बीच्या पिकांना फायदेशीर ठरली आहे. रब्बीच्या गहू, हरभरा, मका आदी पिकांना वाढीसाठी थंडीची गरज आहे. त्यामुळे सोयगाव तालुक्यात पिकांना पुरेशी थंडी मिळत आहे. वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागात शेकोट्याचे प्रमाण वाढलेले आहे.