रॅलीत विद्यार्थ्यांनी भव्य ‘तिरंगा’ घेतला हाती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीतील किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये “हर घर तिरंगा” अभियानाअंतर्गत परिसरातील नागरिकांना जागृत आणि प्रोत्साहित करण्यासाठी तसेच आपल्या राष्ट्रध्वजाबाबत जागरूकता वाढवून वैयक्तिक बंध निर्माण होण्यासाठी परिसरात तिरंगा यात्रा काढण्यात आली. रॅलीत भव्य अशा तिरंगा विद्यार्थ्यांनी हाती घेतल्याने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
कार्यक्रमाला माजी महापौर जयश्रीताई महाजन यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली. यशस्वीतेसाठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील तसेच सरोज पाटील, सरला झांबरे, आशा महाजन, विकास नेहते, प्रफुल्ल नेहते, विजय चौधरी, श्री.सुरवाडे आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.