गोमातेचे पूजन करुन समाजबांधवांनी खाऊ घातली ‘लापसी’
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील नेरी नाक्यालगतच्या पांझरापोळ गोशाळेत संत नरहरी सोनार बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने निरंतर पितृपक्षाचे औचित्य साधून मोक्ष प्राप्ती धर्म जागृती, संरक्षण गो संरक्षणनिमित्त रविवारी, १४ सप्टेंबर रोजी सामूहिक गोसेवेचा कार्यक्रम पार पडला. गेल्या १० वर्षांपासून संस्थेतर्फे हा उपक्रम राबविला जात आहे. सुरुवातीला सामूहिक हनुमान चालिसाचे पठण करुन गोमातेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित समाजबांधवांनी त्यांच्या हस्ते गोशाळेतील गाईंना ‘लापसी’ खावू घातली.
त्यानंतर समाजातील इतर संस्था, मंडळे प्रतिनिधी यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात भाजपा महानगरच्या कोषाध्यक्षपदी विजय वानखेडे, अखिल भारतीय सुवर्णकार हितकारणी सभेच्या उपाध्यक्षपदी संजय विसपुते यांच्या निवडीबद्दल तसेच समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या वृत्तांना प्रकाशझोतात आणणारे पत्रकार शरद भालेराव, छायाचित्रकार सुभाष भालेराव, अतुल वडनेरे, आदर्श शिक्षक विजय बागुल यांचा संस्थेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सचिव जगदीश देवरे यांनी संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी गोसेवावर्ती विजय काबरा, सोनार समाज वंशावळकार ललित महाराज अहिरराव, विजय बागुल यांनी मार्गदर्शन केले.
यांची लाभली उपस्थिती
कार्यक्रमाला अध्यक्ष रमेश वाघ, राजेश बिरारी, सुनील सोनार, बी. एस.पिंगळे, विजय वानखेडे, संजय विसपुते, भगवान दुसाने, नंदू बागुल, हेमंत विसपुते, अरविंद दुसाने, ॲड.केतन सोनार, यशवंत वडनेरे, पत्रकार शरद भालेराव, अतुल वडनेरे, अरुण वडनेरे, सुनील बिरारी, रत्नाकर दुसाने, इच्छाराम दाभाडे, रत्नाकर विसपुते, राजु रणधीर, हर्षल सोनार, विठ्ठल दुसाने, उत्तमराव नेरकर, दीपक जगदाळे, देविदास सोनार, शशिकांत जाधव, संजय पगार, विजय सोनार, संजय सोनार, संजय भामरे, दीपाली सोनार, सुनिता पिंगळे, मालती विसपुते, संध्या विसपुते आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी संत नरहरी सोनार बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह समाजबांधवांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन तथा आभार जगदीश देवरे यांनी मानले.



