पाचोऱ्यात आ.किशोर पाटील यांना जोरदार धक्का

0
12

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

येथील शिंदे गटाचे आ.किशोर पाटील यांचे खंदे समर्थक विद्यमान बाजार समितीचे संचालक तथा नगरसेवक लखीचंद पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस वडजी येथील जगदीश पाटील यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन आणि जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व पाचोरा-भडगाव भाजपा नेते अमोल शिंदे, अमोल पाटील, सोमनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भडगाव शहर व ग्रामीण भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत बुधवारी, १६ ऑगस्ट रोजी जामनेर येथे जाहीर प्रवेश केला. यामुळे शिवसेना शिंदे गटाचे आ.किशोर पाटील यांच्यासह मा.आमदार दिलीप वाघ यांनाही मोठा धक्का बसला आहे. आगामी भडगाव नगरपरिषद आणि जि.प. आणि पं.स.च्या निवडणुकीवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी अमोल शिंदे यांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

स्व.बापूजी फाउंडेशनच्या माध्यमातून लखीचंद पाटील यांची भडगाव शहरासह ग्रामीण भागात तरुणांची मोठ्या प्रमाणात साखळी तयार केलेली आहे. तसेच बाजार समितीचे संचालक आणि भडगाव नगरपरिषदेत नगरसेवक म्हणूनही ते निवडून आलेले आहेत.त्याव्यतिरिक्त विविध सामाजिक उपक्रमातही तेे अग्रेसर आहेत. त्यांच्या भाजपा प्रवेशाने आगामी भडगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीचे गणित बदलणार असल्याचे मानले जात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस जगदीश पाटील यांच्या प्रवेशाने गुडे-वडजी परिसरात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणार आहे. जगदीश पाटील यांच्यासारख्या तरुण आणि सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या चेहऱ्यामुळे नक्कीच भाजपाला या भागात भविष्यात फायदा होईल, असे मानले जात आहे.

यांचाही भाजपात झाला प्रवेश

यावेळी मा.नगरसेवक जहांगीर मालचे, शिवसेना उपशहरप्रमुख विनोद राजपूत, युवासेना तालुका संघटक जितेंद्र पाटील, सुरेश सोनवणे, वसिम शेख, किशोर राजपूत, चेतन राजपूत, मुन्ना परदेशी, हर्षल राजपूत, रघुनंदन पाटील, राहुल ठाकरे, चेतन चौधरी, सचिन पवार, प्रथमेश पाटील, राहुल मालचे, सचिन जाधव, लाला परदेशी, नितेश पाटील, राहुल वैद्य, राहुल कासार, राहुल सोनार, सनी पाटील, लक्ष्मीकांत (भैय्या) पाटील, अमोल पाटील, स्वप्निल पाटील, महेश पाटील, चेतन काळे, चेतन सोनवणे, राहुल सोनार, आकाश पाटील, दिव्येश कासार, संदीप पाटील, खुशाल महाजन, जयेश पाटील, गोरख सोनवणे, रामू पाटील, भूषण पाटील, अण्णा पाटील, विजय पाटील, भुरा आप्पा, रावसाहेब पाटील, बबलू पाटील, जितू पाटील या पदाधिकाऱ्यांसह इतर कार्यकर्त्यांनीही प्रवेश केला.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, पाचोरा-भडगाव भाजपा नेते अमोल शिंदे, भाजपा चिटणीस सोमनाथ पाटील, माजी सभापती बन्सीलाल पाटील, शहराध्यक्ष बन्सीलाल परदेशी, अनिल पाटील, समाधान पाटील, मुकेश पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here