साईमत, नवापूर-प्रतिनिधी
जि.प.शाळा थुवा येथे रक्षाबंधन सणानिमित्त विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या .त्यामध्ये सजावटीसाठी व्ोगव्ोगळ्या बियांचा वापर करून“ एक मुल एक झाड-एक राखी“ हा उपक्रम राबविण्यात आला.
बियांचा वापर केल्यामुळे राखी पाण्यात विसर्जन केली किंवा इतर ठिकाणी पडल्यास बियांपासून वृक्षनिर्मिती होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राखी तयार करण्यात आली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः जे झाड लावले त्याच्या रक्षणाची जबाबदारी झाडाला राखी बांधून उचलली. त्यानंतर सर्व मुलींनी मुलांना राख्या बांधल्या मुलांनी मुलींना त्याबदल्यात भेट दिली. रक्षाबंधन सणाविषयी प्रतिज्ञा कविता पाटील यांनी स्वतः लिहून मुलांकडून म्हणून घेतली. या सर्व कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन कविता पाटील यांनी केले. व कार्यक्रमासाठी प्रेरणास्रोत म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी आर. सी. पवार, केंद्रप्रमुख किशोर रायते तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक गोपाळ मावळी सरांनी सहकार्य केले.