रक्षाबंधननिमित्त ‘ग्रीन आर्मी’ने राबविला स्तुत्य उपक्रम
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
येथून जवळील मालदाभाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यानिमित्त ग्रीन आर्मीच्या विद्यार्थ्यांनी गणित सुत्रे विज्ञानाच्या संज्ञा वापरुन झाडांसाठी राख्या तयार केल्या होत्या. जेव्हा-जेव्हा विद्यार्थी झाडांना पाणी देण्यासाठी येतील किंवा झाडाच्या सावलीत बसतील तेव्हा-तेव्हा त्याला भूमितीय आकृत्यांची माहिती, पायथागोरस प्रमेय, सुत्रे, घातांकाचे नियम विज्ञानातील न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम, विज्ञानातील पचन संस्था, श्वसन संस्था, गतीचे नियम यासारख्या अनेक संज्ञा संकल्पना पाहतील वारंवार पाहिल्याने मुखोद्गत होतील, असा ग्रीन आर्मीचा उद्देश आहे.
गेल्या आठवड्यापासून गणित शिक्षक जी.टी.पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी राख्या बनविण्याचे काम सुरू केले होते. अध्यक्षस्थानी प्र. मुख्याध्यापक एस.आर.शिकोकारे होते. यशस्वीतेसाठी आर.एल.कोळी, एन.जी. पाटील, राजेश मोरे, मनोज जैन तसेच ग्रीन आर्मी सदस्य सोनल चौधरी, साक्षी वंजारी, भूमिका उंबरकर, गायत्री पाटील, जागृती बोरसे, प्रतिक्षा खराटे यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन विजय सैतवाल तर आभार एन. एस. पाटील यांनी मानले.