१७ वर्षाची अखंड परंपरा कायम
साईमत/यावल/प्रतिनिधी
तालुक्यातील महेलखेडी गावात विजयादशमीनिमित्त एसटीबसची उत्कृष्ट लक्षवेधी सजावट करून पूजन करण्यात आले. ग्रामस्थ आणि राज्य परिवहन महामंडळातील यावल आगारातील संबंधित त्यादिवशी ड्युटीवर असलेल्या वाहन चालकांची कौतुकास्पद प्रेरणादायी प्रथा गेल्या १७ वर्षांपासून सुरू आहे.
महेलखेडी गावात यावल एसटी आगारातील बसचे विजयादशमीनिमित्त पूजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे महेलखेडी गावात चालक व वाहक, ग्रामस्थ यांच्यावतीने हा कार्यक्रम राबविला जातो. यंदाही बस पूजनाचा मान चालक सुनील महाजन, छाया महाजन यांचा मुलगा भावेश महाजन यांची पत्नी भाग्यश्री महाजन, मोठा मुलगा काशिनाथ महाजन यांची पत्नी सपना महाजन, वाहक तुषार कपले, सोनल कपले यांचा मुलगा लक्षित पुनित या दाम्पत्याला मिळाला. त्यांच्या हस्ते यावल हरिपुरा बसचे पूजन करण्यात आले.
महेलखेडी गावातील महाजन परिवार ग्रामस्थांना विश्वासात घेऊन आणि सहकार्याने गेल्या १७ वर्षापासून कार्यक्रम राबवित आहे. याप्रसंगी चालक आर.एम.शेख, वाहक अकील तडवी, लोकेश येवले, ललित कपले, प्रवीण कपले, ललित पाटील, प्रमोद महाजन, नामदेव झुरकाळे, कपिल झुरकाळे, गुंजन महाजन, विक्रम पाटील, अशोक तायडे, विक्रम पाटील यांच्यासह महेलखेडी ग्रामस्थ उपस्थित होते.