सोहळ्याला मंत्र्यासह लोकप्रतिनिधींची लाभणार उपस्थिती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील फत्तेपूर, तोंडापूर येथे विविध महत्त्वपूर्ण विकासकामांचे भव्य उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्या हस्ते रविवारी, १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन, मंत्री ना.गुलाबराव पाटील, ना. संजय सावकारे यांच्यासह खा.स्मिताताई वाघ, सर्वश्री लोकप्रतिनिधी आ.एकनाराव खडसे, आ.किशोर दराडे, आ.सत्यजित तांबे, आ.सुरेश भोळे, आ.किशोर पाटील, आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे, आ.अनिल पाटील, आ.चंद्रकांत पाटील, आ.मंगेश चव्हाण, आ.अमोल पाटील, आ.अमोल जावळे तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प.च्या सीईओ मिनल करनवाल, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, सा.बां.मंडळाचे अधीक्षक अभियंतां प्रशांत सोनवणे आदी मान्यवरांची उपस्थिती राहील.
मुंबई मंत्रालयाच्या पर्यटन, सांस्कृतिक कार्य विभागातर्फे जामनेर तालुक्यातील तोंडापूर, फत्तेपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह शिवसृष्टी उभारणी करणे अशा वास्तूंचा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे. कार्यक्रम सोहळ्यात मतदारसंघातील पायाभूत सुविधा, सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्वाच्या कामांचे लोकार्पण होणार आहे. त्यामुळे जामनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळणार आहे. यावेळी मान्यवर, जनप्रतिनिधी, अधिकारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. लोकार्पण सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.