Jamner Durga Festival President Jagdish Sonar : जामनेरात सप्तश्रृंगी दुर्गा उत्सव मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी जगदीश सोनार

0
17

निवडीत उपाध्यक्षपदी जयेश गवळी तर सचिवपदी ॲड.विनोद धनगर यांचा समावेश

साईमत/जामनेर/प्रतिनिधी : 

शहरातील जळगाव रस्त्यालगतच्या प्रकाश नगर, प्रेम नगर, गोविंद कॉलनीत सालाबादप्रमाणे यंदाही सप्तश्रृंगी दुर्गा उत्सव मित्र मंडळाची नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यात सर्वानुमते मंडळाच्या अध्यक्षपदी पुनश्च: अध्यक्षपदी जगदीश बाबुराव सोनार यांची निवड जाहीर करण्यात आली. तसेच उर्वरित कार्यकारिणी जाहीर करण्यात येऊन मंडळातर्फे यंदा राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. निवड जाहीर झाल्यानंतर जगदीश सोनार यांचा परिसरातील अनेकांनी सत्कार करुन त्यांच्यासह सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचेही कौतुक केले आहे.

उर्वरित नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी जयेश समाधान गवळी तर खजिनदारपदी ॲड.महेंद्र पाटील, ॲड.आशुतोष चंदेले, सचिवपदी ॲड.विनोद जनार्दन धनगर, सहसचिवपदी मनोज महाजन, सल्लागारपदी गणेश कोळी, सुदाम पाटील, मनीष पाटील, भूषण पाटील यांचा पदाधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. तसेच उर्वरित कार्यकारिणीतील सदस्यांमध्ये अविनाश मराठे, श्रीकांत चौधरी, दीपक फिरके, कौस्तुभ चौधरी, हर्षल वरखड, दीपक चौधरी, निलेश माळी, दिप्तेश ठाकूर, सोनू जोशी, प्रसाद पाटील, सागर महाजन, सुरज सपकाळे, आकाश पाटील, नाना कापडे, चंद्रकांत आण्णा तायडे, साई पाटील, पवन माळी, तनय सोनवणे, ऋषी शेळके, सोनू चौधरी, जयदीप चौरे, जगदीश चौरे, कुणाल चौरे, राहुल माळी, केशव तेली, दादू पाटील, समर्थ ठाकूर, अजय प्रधान, रितेश लोखंडे, वेदांत पाटील यांचा समावेश आहे.

मंडळातर्फे विविध उपक्रम राबविण्याचा मानस

मंडळाचे यंदा २८ वे वर्ष आहे. मंडळाच्यावतीने नवरात्रीनिमित्त तुळजापूर भवानी देवीची आठ फुटाच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. तसेच मंडळातर्फे विविध उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्याचा मानस असणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष जगदीश सोनार यांनी सांगितले. मंडळाच्या उपक्रमासाठी भाविकांसह परिसरातील नागरिकांनी यथाशक्ती सहकार्य करावे, असेही आवाहन मंडळातर्फे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here