‘Seva Pandharvada’ : जळगावात ‘सेवा पंधरवडा’तून पर्यावरण संरक्षणाचा संदेश

0
18

पोलीस लाईन परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

शहरातील नवीन पोलीस लाईन परिसरात “सेवा पंधरवाडा” उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हरित उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात नुकताच पार पडला. उपक्रमाला आ.सुरेश भोळे (राजूमामा), जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मंडल अध्यक्षा दीपमाला काळे, “सेवा पंधरवाडा” महानगर संयोजक विजय वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी अ‍ॅड. शुचिता हाडा, भारती सोनवणे, रेखा वर्मा, विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, मनोज काळे, अशोक राठी, नंदिनी दर्जी, दीप्ती चिरमाडे, चेतन तिवारी, सतीश पाटील, सचिन बाविस्कर, श्याम करमचंदानी, गुरबक्ष जाधवाणी, संदीप पाटील, संजय अडकमोल, ऋषिकेश शिंपी आदी मान्यवर उपस्थित होते. वृक्षारोपणासोबत उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना पर्यावरण संतुलनाचे महत्त्व पटवून दिले. वृक्षांची निगा राखण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here