सुवर्णकार सेनेच्या बैठकीत नियोजनासह कार्यकारिणी जाहीर
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव जिल्हा महाराष्ट्र सुवर्णकार सेनेच्यावतीने येत्या १८ जानेवारी २०२६ रोजी जळगाव येथील छत्रपती संभाजीनगर हायवे रस्त्यालगतच्या आदित्य लॉनमध्ये दहावा ऋणानुबंध वधु-वर-पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे. यासंदर्भात सुवर्णकार (सोनार) समाजाची नियोजन बैठक नुकतीच पार पडली. अध्यक्षस्थानी राजेंद्र बिरारी होते. याप्रसंगी समाजबांधवांनी विविध सूचना मांडल्या. बैठकीत सर्व सूचनांचा विचार करून मेळाव्याचे नियोजन अधिक प्रभावी केले जाईल, असे आश्वासन जिल्हाध्यक्ष संजय विसपुते यांनी दिले. बैठकीत मेळाव्याची कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली.
कार्यकारिणीत स्वागताध्यक्षपदी रमेश वाघ, मेळावा प्रमुख सुभाष सोनार, उपप्रमुख नितीन गंगापुरकर, नियोजन समिती प्रमुख शरद रणधीर, सचिवपदी प्रशांत विसपुते, सहसचिव दिलीप पिंगळे तर प्रसिद्धी प्रमुख गोकुळ सोनार यांची निवड झाली. बैठकीत मेळाव्यासाठी नियुक्त केलेल्या नवीन समितीचे उपस्थित समाजबांधवांनी कौतुक करुन अभिनंदन केले. बैठकीत संलग्न समित्यांचे गठन लवकरच करण्यात येईल, अशी माहिती उपाध्यक्ष विजय वानखेडे यांनी दिली.
मुलींची उपस्थिती वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे
मेळाव्यासाठी वधु-वरांची जगदीश देवरे आणि डॉ. विजय बागूल यांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी. तसेच मुलींची उपस्थिती वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, अशा प्रमुख सुचनाही देण्यात आल्या. बैठकीत समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी संजय पगार यांनी आभार मानले.
