इंदिराबाई ललवाणी विद्यालयात विद्यार्थ्यांनी केले ज्ञानार्जन

0
30

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे तथा शिक्षकांना विविध झाडांची रोपे भेट व शुभेच्छा देऊन शिक्षक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा.के.डी.निमगडे, प्रा.जी.जी.अत्तरदे, प्रा.हर्षा दहीलेकर, प्रा.संजय क्षीरसागर, प्रा.दिनेश महाजन आदी ज्येष्ठ शिक्षकांची उपस्थिती होती.

शिक्षक दिनी सर्व विद्यार्थ्यांनी वर्ग सजावट, विज्ञान आकृतीचे रांगोळी, प्रोत्साहनपरक सुविचार संग्रह पोस्टर, विद्यार्थ्यांनीच वर्गात शिक्षकांची भूमिका बजावून वर्गात ज्ञानार्जन केले. तसेच प्रत्येक वर्गनिहाय कार्यक्रम घेण्यात आले. प्रत्येक वर्ग सजावट, उत्कृष्ट विद्यार्थी शिक्षक निरीक्षकाचे काम सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा.सविता महाजन, प्रा.सुमित काबरे, प्रा.सचिन बावस्कर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांचा गौरव

शिक्षकांची भूमिका साकारणाऱ्यांमध्ये केशव कस्तुरे, कल्याणी गावंडे, जागृती चौधरी, अश्विनी चिंचोले, पलक ओसवाल, प्रेरणा साबळे, खुशी तेली, प्रतीक्षा भामेरे, लीना पाटील, सचिन सोनवणे, प्रेरणा साबळे, सचिन राठोड यांचा समावेश होता. त्यांनी वर्गात उत्कृष्टरित्या शिकविण्याची भूमिका केल्याबद्दल भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

यांनी घेतले परिश्रम

कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक एस. आर.चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी प्रा.आर.आर.पाटील, प्रा.संदीप राजपूत, प्रा.सचिन गडाख, प्रा.राजेश खडके, प्रा.राजश्री पाटील, प्रा.वैशाली पाटील, क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार, शिक्षकेतर कर्मचारी सुधाकर सुरळकर, राहुल काळे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here