साईमत जळगाव जळगाव
जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित शहरातील कांताई सभागृहात झालेल्या १४ व्या ज्युनिअर रोल बॉल स्पर्धेत मुलींच्या गटात जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचालित सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संघाने अंतिम सामन्यात प्रथम क्रमांक पटकावला. विजयी संघामध्ये गीत जैन, विधी सोनी, पेहेल गद्या,संजम चाबडा, तान्या चतरानी, लबडी पांगरिया, तस्नीम बदामिया या खेळाडूंचा समावेश होता.
विजयी ठरलेल्या विद्यार्थिनीचा जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले. त्या म्हणाल्या की, या संघास जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे संचालक मंडळ, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यासह सर्व पालक या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच या यशामागे विध्यार्थ्यानी घेतलेली मेहनत, त्यांच्यामध्ये असणारी कौशल्ये व शिक्षकांचे त्यांना लाभलेले उत्तम मार्गदर्शणामुळेच विद्यार्थ्यांना हे यश प्राप्त झाले असे त्यांनी यावेळी नमूद केले.
शालेय शिक्षणाबरोबरच, व्यक्तिमत्व विकास, विविध अॅक्टीव्हीटीलाही महत्त्वपूर्ण स्थान देणारी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व शारीरिक गुणवत्तेस सतत प्रेरणा व चालना देणाऱ्या सावखेडा येथील सी.बी.एस.ई.बोर्डच्या जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमधील विध्यार्थ्यांच्या या यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर स्पर्धेसाठी क्रीडाशिक्षक संजय चव्हाण यांचे या विध्यार्थिनीना मार्गदर्शन लाभले.