दिक्षी शिवारात पंधरा दिवसाच्या आत गोवंशाचा टेम्पो पकडला ; पोलीस ठाण्यात गुन्हा

0
13

साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी

११ जुलै रोजी कसबे सुकेणे दिक्षी ओझर रस्त्यावर दिक्षी गावाजवळ रात्रीच्या वेळी हिंदुंच्या पवित्र एकादशीच्या दिवशीच कत्तलीसाठी घेऊन जाणारा टेम्पो नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडला व गाईची सुटका झाली ही घटना ताजी असतांनाच काल मंगळवारी रात्री साडेनऊ या सुमारास भरधाव वेगाने जाणारा टेम्पो दिक्षी जिव्हाळे शिवावर पलटी झाला आजुबाजूच्या नागरिकांनी घटना स्थळी धाव घेतली व मदतीसाठी टेम्पो जवळ जाताच त्यात एक गाय व तीन बैल आढळले तेव्हा जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले .नागरिक जमा होताच गाडीतील ड्रायव्हर अंधाराचा फायदा घेत पळून गेला तर रवींद्र धुमाळ हा नागरिकांच्या तावडीत सापडला
थोडक्यात हकीकत अशी की रविंद्र सुरेश धुमाळ वय २५ रहाणार जळगांव फाटा ता निफाड हा अकबर बाबु शेख रा ओझर याचे सांगणेवरून निफाड कडून पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा कंपणीच्या पिकअप क्र.एम एच १५ बी जे ११६० हीचेत ०४ गोवंश जातीची जनावरे आखडलेल्या अवस्थेत त्यांची तोंडे दोरांच्या सहाय्याने करतेने यांधुन निर्दयतेने दाटीवाटीने कोंबुन त्याचेसोबत असलेला इसम नामे अकबर बाबु शेख याचे सांगणेवरून कत्तलीच्या इराद्याने भरधाव वेगात कसबे सुकेणे ते ओझर रोडने रस्त्याचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन वेदारकारपणे चालवून वाहतुक करुन घेवून जात असतांना पिकअप नादुरुस्त होवुन पिकअप चालकाचा पिकअप वरील ताबा सुटून ती रोडच्या कडेला पलटी झाली व पेटली यात टेम्पोची कॅबीन जळाली अपघातात पिकअप चालकालही किरकोळ जखमी झाला नागरिकांनी अनेक वेळा फोन करूनही पोलीसांनी लवकर प्रतिसाद दिला नाही नागरिकांनी गाईना सुखरूप बाहेर काढले बऱ्याच वेळानंतर अपघात स्थळी, आर.एस घुमरे, अनुपम जाधव, डी एल. वाघेरे, यांनी भेट देऊन पंचनामा केला स्वताचे जबर दुखापतीस कारणीभुत होवुन गोवंश जनावरांचे किरकोळ दुखापतीस व पिकअपचे नुकसानीस कारणीभूत झाला म्हणून रविंद्र धुमाळ यास पंचनामा करून ताब्यात घेतले व एक गाय किंमत वीस हजार .तीन बैल किंमत साठ हजार, व महिंद्रा कंपणीची टेम्पो क्र एम एच १५ बी जे ११६० किंमत अडीच लाख रुपये असा माल जप्त करुन प्राणी संरक्षण अधिनियम कायदयाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

ओझर पोलिस वेळेवर का पोहचत नाही …नागरिकांचा प्रश्न

घटना घडल्यानंतर जमलेल्या नागरिकांनि घटना घडल्याची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला दिली परंतु अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर घटनास्थळी पोहचण्यासाठी पोलिसांना तबल दीड तास लागला तो पर्यँत घटनेचे माहिती आजपासच्या सर्व गावांना माहीत झाली घटनास्थळी मोठी गर्दी झाली. शेवटी पोलिस कंट्रोल ला फोन करावा लागला.ओझर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेहमीच कत्तलीसाठी जाणारे जनावरे सापडतात यातून पोलिसांच्या कर्तृत्वावर प्रश्न निर्माण होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here