साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
शहरात ठाकरे गटाला पुन्हा एकदा ‘खिंडार’ पडले आहे. शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील यांनी सत्कार केला. त्यात प्रामुख्याने परेश नाईक, कैलास इंगळे, हरी चौधरी, आबा चौधरी, गणेश चौधरी, मयूर जाधव, सुदर्शन भागवत, अजय चौधरी, योगेश मांडगे, सुलतान बागवान, तेजेंद्र चौधरी, सागर मांडगे, चेतन अहिरराव, करण चित्ते, प्रशांत जगताप, विकास मोरावकर, अक्षय बारड आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, मुकुंद धनवडे, सागर पाटील, शहर प्रमुख विलास महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, पप्पू भावे, अभिजीत पाटील, वाल्मीक पाटील, देवेंद्र आप्पा, रवींद्र जाधव, कमलेश बोरसे, नगरसेवक नंदकिशोर पाटील, समाधान पाटील, रोहित चौधरी आदी उपस्थित होते.